सीरियल किलरची दहशत! एक-एक करून 9 महिलांची कत्तल, मारण्याची पद्धत एकच; गूढ उकलेना
Crime News Today: सहा महिन्यात नऊ महिलांच्या हत्या, पद्धत एकच या प्रकारामुळं गावात एकच खळबळ उडाली आहे. महिलांच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहेत.
Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या बरेलीत चित्रपटालाही लाजवेल अशा घटना सध्या घडत आहेत. शहरात एक सिरियल किलर फिरतोय. जून महिन्यापासून शहरात एकच पद्धत वापरून महिलांची हत्या करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 9 महिलांचे बळी गेले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून महिलांची एकाच पद्धतीने हत्या करण्यात येत असल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अजूनही खुनी मोकाटच फिरतोय.
बरेली जिल्ह्यातील शीशगढ आणि शाही या गावांत गेल्या पाच महिन्यांपासून महिलांचा साडी किंवा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या करण्यात आल्याच्या नऊ घटना समोर आले आहे. या हत्यामागे नक्की कोणाचा हात आहे याचा कसून शोध घेतला जात आहे. पण या घटनांमुळं परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. महिला घरातून बाहेर जाण्याचेही टाळत आहेत. गावकरीच गावात रात्रीची पहारेदारी करत आहेत.
खुन्याच्या शोधात पोलिसांनी विशेष पथक राबवले आहे. पोलिसांनी या गावात पाहारा वाढवला आहे. तसंच, छोट्यातील छोटी घटना लक्षात घेऊन त्यानुसार कारवाईचे आदेश दिले आहेत. महिलांना लक्ष्य करुन त्यांची हत्या होत असल्याने आरोपीचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
9 महिलांच्या हत्या
शाही येथील आनंदपूर गावच्या रहिवासी प्रेमवती 29 जून रोजी जनावारांना चारा आणण्यासाठी गेल्या असता त्यांची हत्या करण्यात आली. दुसऱ्या दिवशी शेतात त्यांचा मृतदेह आढळला. गळा घोटून त्यांची हत्या करण्यात आली होती. अद्यापही या हत्याकांडाचे गूढ उलगडलेले नाहीये. त्यानंतर अशाच प्रकार नऊ महिलांची हत्या करण्यात आली. एकापाठोपाठ हत्या झाल्याने एकाच व्यक्तीने हे घडवून आणलं आहे की यामागे नक्की कोणाचा हात आहे, हे अद्याप समोर आलेलं नाहीये.
बरेली परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक (आयजी) डॉक्टर राकेश सिंह आता थेट मैदानात उतरले आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी त्यांनी विशेष पथकं तैनात केले आहेत. सर्व नऊ घटनांमध्ये खूप समानता आहे. या प्रकरणी कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमवती, महमूद, धनवती, वीरावती, कुसमा देवी, शांती देवी, प्रेमवती, रेशमादेवी, दुलारी देवी या नऊ महिलांना गेल्या पाच महिन्यात खून करण्यात आला आहे.