Hyderabad Crime : प्रेमा तुझा रंग कसा? गेल्या काही महिन्यांपासून देशात महिलांवरील हल्ल्यांचा घटना वाढल्या आहे. मुंबईतील वसतिगृहात तरुणीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. मीरा रोडमध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेची निघृण हत्येने मुंबई हादरली. दिल्लीमधील तर श्रद्धा, निकीता आणि साक्षी या तरुणींचा हत्याकांडाने संपूर्ण देशाला निशब्द करुन सोडलं. अशातच अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवाची पूजा अर्चा करणारा पुजारी, ज्याला देवानंतर मानाचं स्थान असतो असा हा देवाची सेवा करणारा पुजारीला पोलिसांनी अटक केली. या पुजाऱ्याचे प्रताप ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. विवाहित असलेला हा पुजारी मंदिरात येणाऱ्या एका महिलेच्या प्रेमात पडला. त्यांने तिच्याशी बोलण्यातून जवळीक साधली. हळूहळू महिलाही पण त्याचा प्रेमात पडली. महिलेला माहिती नव्हतं की या पुजारीचं लग्न झालं आहे. दोघांमधील जवळीक दिवसेंदिवस वाढत होती. त्यांचामध्ये शारीरिक जवळीकही वाढली.   (Crime news )


प्रेयसीसोबत पुजारीने वारंवार शारीरिक संबंध (Physical relationship) ठेवले. असातून महिला एक दिवस पुजारीकडे आली आणि तिने गर्भवती असल्याची गोड बातमी दिली. विवाहबाह्य संबंध असल्याने पुजारीला धक्का बसला. महिलेने पुजारीला लग्नासाठी तगादा लावला. पुजारी नसूता विवाहित नव्हता तर तो दोन मुलांचा बापही होता. त्यामुळे आता काय करायचं या विचारातून त्याने धक्कादायक पाऊल उचलं. अनैतिक संबंधांचा शेवट कायम वाईटच होतो. (Priest kills Girlfriend)


या पुजारीने संधी साधून एक दिवस महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. तिच्या मतृतदेहाचे तुकडे केले आणि गटारीत फेकून दिली. ही घटना हैदराबादमधील मैसम्मा मंदिरातील आहे. व्यंकट साई सुरा कृष्ण हा पुजाऱ्याने 30 वर्षीय महिलेला आपल्या प्रेम जाळ्यात अडकवलं होतं. धक्कादायक म्हणजे स्वत:च पोलीस स्टेशनला जाऊन आपली प्रेयसी बेपत्ता असल्याची तक्रार त्याने केली. (Crime news priest girlfriend pregnant after extramarital affair he killed apsara trending news)


पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली. पूजारीकडून माहिती घेताना पोलिसांना त्याच्यावर संशय वाढला आणि सीसीटीव्हीची मदतीतून पुजारीचा गुन्हा उघड झाला. दरम्यान नारकुडा गावात राहणारी 30 वर्षीय अप्सरा एका खासगी कंपनीत काम करायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्सरा साई कृष्णासोबत सुल्तानपल्ली येथील गायींच्या आश्रयाला गेली आणि तिथे कृष्णाने तिची हत्या केली.