भोपाळ : शिवसेना महिला नेत्याच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेच्या घरातच सेक्स रॅकेट सुरू होतं. घरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ज्यानंतर पोलिसांनी 5 मुली, 5 ग्रहाकांसह महिला मॅनेजर आणि चालकाला अटक केली आहे. या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी या महिला नेत्याला देखील अटक केली आहे. ज्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरु लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही कारवाई मध्य प्रदेशातील सीहोर येथे करण्यात आली आहे. या कारवाईत ज्या महिलेला अटक करण्यात आली आहे ती स्वत:ला समाजसेविका असल्याचे सांगते. तसेच तिने शिवसेनेच्या तिकीटावर नगरपालिकेची निवडणूक (Municipal election) देखील लढवली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अनुपमा तिवारी (Anupama Tiwari) असे या महिलेचे नाव आहे.


यांच्या घरामध्ये सेक्स रॅकेट (Crime News) सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीसांनी तिवारी यांच्या घरावर छापेमारी केली. त्यावेळी या ठिकाणी काही मुली आणि ग्राहक देखील या ठिकाणी असल्याचे पोलीसांनी पाहिले आणि त्यांनी त्या सगळ्यांना आपल्या ताब्यात घेतले.


पोलिसांनी सर्वांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे, तसेच या घरातून 28 हजारांची रोकड आणि 2 कार जप्त केल्या आहेत.


पोलिसांनी या छापेमारीबाबत अत्यंत गुप्तता पाळली होती त्यामुळे तेथून कुणालाही पळून जाता आले नाही. याकारवाईत पोलिसांनी 5 मुली आणि 5 ग्राहकांना ताब्यात घतले. घटनास्थळी पोलिसांना नशेचे काही सामान देखील मिळाले आहे. या सर्व मुली भोपाळच्या (Bhopal) असल्याचे सांगण्यात येत आहे.


महिला मॅनेजर इंदुलता या मुलींना घेऊन रुमवर येत होती. प्रत्येक ग्राहकाकडून 500 रुपये घेतले जात होते. पोलीस अटक केलेल्या लोकांकडे सखोल चौकशी करत आहेत.


कोण आहे अनुपमा तिवारी ?


अनुपमा मुळची होशंगाबाद येथील रहिवासी आहे. सीहोर हे तिचे सासर आहे. अनुपमाच्या पतीचे 2018 मध्ये निधन झाले आहे.  2015 च्या निवडणुकीत तिला केवळ 694 मते मिळाली होती. अनुपमा तिवारी ही स्वत:ला समाजसेविका असल्याचे सांगते. 2015 च्या निवडणुकीत तिने शिवसेनेच्या तिकिटावर नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती.


नेहरू युवा केंद्राकडून काही वर्षांपूर्वी योगाचार्य (Yogacharya) म्हणून तिचा सन्मान केला गेला होता. महिलांच्या सुरक्षेसाठी नेहमी त्या समोर येऊन विधानं करत होत्या. परंतु त्याच महिलांसंदर्भात इतक वाईट कृत्य करत असल्याचं समोर आलं आहे.