Father In Law Beats Daughter In Law : भारतात अनेक ठिकाणी कुटुंबामध्ये घरातील कर्त्या पुरुषाला घर चालविण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं. अशावेळी तो पाठीमागे बायको मुलांना आपल्या आई वडिलांसोबत ठेवून जातो. आपलं कुंटुब एकत्र राहिल आणि एकमेकांना आधार होईल. शिवाय मोठ्या शहरात राहण्यापासून इतर खर्च वाढतो. त्यामुळे घरातील पुरुष एकटा शहरात येतो. पण अनेक वेळा त्यापाठीमागे घरात अनेक गोष्टी घडतात. बायकोचं दुसऱ्या कोणासोबत अफेयर होतं. तर कधी ती सासरच्या लोकांकडून शारीरिक आणि मानसिक कृत्याची शिकार होते. असे अनेक बातम्या आपण ऐकल्या आणि वाचल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच एक घटनेच्या व्हिडीओने एका सासऱ्याचं धक्कादायक कृत्य सगळ्यांसमोर उघड झालं आहे. त्याचं हे कृत्य त्याचा नातीनेच सगळ्यांसमोर आणलं आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या व्हिडीओने अनेकांच्या झोप उडवली आहे. मुलगा मुंबईला काम करत असतो. या गोष्टीचा फायदा घेत सासऱ्याने सुनेसोबत जे कृत्य केलं ते पाहून तळ मस्तकातील आग डोक्यात जाते. 


व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती एका महिला शेतात चप्पलेने मारहाण करताना दिसत आहे. त्या महिलेला अमानुष प्रकारे तो मारहाण करत होता. पीडित महिलेचा आवाज ऐकून घरातून तिची मुलीने शेताकडे धाव घेतली. हा सगळा प्रकार पाहून तिलाही धक्का बसला. महिलेची मुलगी तिथे होती त्या चिमुकलीने झालेला प्रकार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. 



तिने आरडाओरड करुन आजोबांना आईला सोडण्यासाठी विनंती केली पण ते महिलेला मारत होते. बऱ्याच वेळ मारहाण केल्यानंतर त्या महिलेला शेतात टाकूनच तो तिथून निघून गेला. या घटनेनंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. 


पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार तो वृद्ध व्यक्ती महिलेचा सासरा होता. किरकोळ वादातून त्याने सुनेला मारहाण केली होती. महिलेने पोलिसांना सांगितलं होते की, तिचा नवरा इथे राहत नसून मुंबईत तो रिक्षा चालवतो. पोलिसांनी सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम 294, 354, 506-बी आणि 294 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 



ही घटनामध्यप्रदेशातील चांदई गावातील आहे. त्या चिमुकलीने काढलेल्या व्हिडीओवरुन ही धक्कादायक घटना समोर आली. वीजबिलावरुन सासरे आणि सून यांच्यामध्ये वाद झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सासरच्या मंडळीवर महिलेने मारहाण आणि विनयभंगाचा आरोप केला आहे. तर सासरच्या मंडळीने सुनेवर कुऱ्हाडीने वार केल्याचा पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 


महिलेवरील मारहाणीचा व्हिडीओ झी24 तास दाखविणार नाही. कारण अशा कृत्याचे झी24 तास निषेध करतं.