Telangana Revenge Murder: मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका तरुणाचा निर्घृण खून करुन त्याचा व्हिडिओ बनला आणि तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना तेलंगनाची (Telangana) राजधानी हैदराबादमध्ये (Hyderabad) घडली आहे. बाचुपल्ली परिसरात पंधरा ते वीस मुलांच्या ग्रुपने एका तरुणाची हत्या केली. हत्येचा व्हिडिओ बनवत तो सोशल मीडियावर 'बदले का जश्न' नावाने शेअर केला. आरोपींनी इन्स्टाग्रामवर (Instagram) आपल्या डान्स करतानाचा व्हिडिओ पोस्ट करत मित्राच्या हत्येचा बदला घेतल्याची घोषणा केली. या घटनेने पोलीसही हैराण झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा ते वीस मुलांच्या ग्रुपने प्रगती नगर तलावाजवळ 26 वर्षांच्या तेजा नावाच्या तरुणाचा पाठलाग केला. त्यानंतर त्याला गाठत त्याची धारदार शस्त्राने हत्या केली. हत्येमागे जुना वाद असल्याचं बोललं जात आहे. हैदराबादमधल्या एसआर नगर इथं झालेल्या एका हत्येप्रकरणी तेजा हा प्रमुख आरोपी होता. 24 ऑक्टोबर 2023 ला तरुण रॉय नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली होती. यात तेजाचाही समावेश होता. 


'तरुणची हत्या आता शरीफची बारी'
तेजाची हत्या केल्यानंतर आरोपींना इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला. यात त्यांनी 'तरुणच्या हत्येचा बदला घेतला. आता शरीफची बारी' असल्याची घोषणा केली. तरुणाच्या हत्येत आरोपी असणाऱ्या तेजाची दोन महिन्यांपूर्वी जामीनावर सुटका करण्यात आली होती. आपल्या आईबरोबर तो प्रगती नगरमध्ये एका भाड्याच्या घरात राहात होता. घटनेच्या दिवशी तेजाची आई गावाला गेली होती आणि तेजा घरी एकटाच होता. 


घटनेच्या दिवशी तेजाने आपल्या मित्रांबरोबर पार्टी केली. त्यानंतर पहाटे 3.30 च्या सुमारास तो बथुकम्मा घाटाजवळ एकटाचा उभा होता. त्यावेळी काही बाईकवुन जवळपास वीस तरुण तिथो पोहोचले. त्यांनी चाकूने तेजावर सपासप वार केले. हल्ल्यातून कशीबशी सुटका करत तेजा पळू लागला. पण आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर पुन्हा हल्ला केला. तेजाची हत्या झाल्यानंतर आरोपींनी रक्ताने माखलेला चाकू हातात मिरवत व्हिडिओ बनवला. तरुणच्या हत्येत ज्यांचा समावेश होता, त्यांची अवस्था तेजासारखीच करणार असल्याची धमकीही आरोपींनी दिली. शरीफ नावाच्या तरुणाचा त्यांनी उल्लेख केला.


व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी काही आरोपींची ओळख पटवत त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.