Amritsar Blast : बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळ (Golden Temple) आणखी एक मोठा स्फोट झाल्याने संपूर्ण पंजाबमध्ये (Punjab) खळबळ उडाली आहे. या स्फोटाची तीव्रता कमी होती. या घटनेची माहिती मिळताच पंजाब पोलिसांचे (Punjab Police) सर्व उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरु केला आहे. मात्र पंजाबमध्ये सुरु असलेल्या स्फोटांच्या मालिकेने पंजाबला हादरवून सोडलं आहे. गेल्या आठवडाभरात अमृतसरमधील (Amritsar) सुवर्ण मंदिराजवळ तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी या स्फोटांमध्ये दहशतवाद्यांचा हात असल्याच्या गोष्टीला नकार दिला आहे. तसेच या स्फोटाप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळील श्री गुरु राम दास निवासजवळ मोठा आवाज ऐकू आला आहे. स्फोट इतका जोरदार होता की लोक घाबरले. त्यानंतर याप्रकरणी ऱ्या पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. शांतता भंग करण्याचा या स्फोटामागील हेतू होता. स्फोटासाठी फटाक्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांचा वापर करण्यात आला होता.




बुधवार मध्यरात्री रात्री सुवर्ण मंदिराजवळ असलेल्या श्री गुरु रामदास सराईजवळ एक वाजण्याच्या सुमारास जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की यामुळे आजूबाजूचे लोक खडबडून जागे झाले. या प्रकारानंतर पंजाब पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. गेल्या पाच दिवसांतील हा तिसरा स्फोट आहे.


दरम्यान, सुवर्ण मंदिराजवळील 'हेरिटेज स्ट्रीट' येथे सोमवारी सकाळीही एक स्फोट झाला होता. या स्फोटात एक जण जखमी झाला होता. यापूर्वी 6 मे रोजीही याच ठिकाणी स्फोट झाला होता. घटनास्थळावरून कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. ही स्फोटके एका बॉक्समध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. गेल्या शनिवारी सुवर्ण मंदिराजवळील पार्किंगमधील ढाब्यात स्फोट झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ढाब्याच्या चिमणीत स्फोट झाल्याचे सांगून वाहणारा हे प्रकरण दाबलं होतं.