Lucknow Court Shootout: लखनऊ कोर्टाच्याबाहेर (Lucknow Court) गोळीबाराची धक्कादायक घडली आहे. वकिलाच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी पोलिसांसमोरच कुख्यात गुंड संजीव जीवाची (Sanjeev Maheshwari Jeeva) गोळ्या झाडून हत्या केली. संजीव जीवा हा मुख्तार अन्सारीचा (Mukhtar Ansari) जवळचा व्यक्ती म्हणून ओळखला जात होता. संजीव जीवावर गोळ्या झाडल्यानंतर पळण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. या गोळीबारात एक मुलीसहा तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. संजीव जीवा हा भाजप नेते ब्रम्हदत्त दिवेदी यांच्या हत्या प्रकरणातला आरोपी होता. याशिवाय त्याच्यावर अनेक गुन्हांची नोंद होती. घटनेनंतर लखनऊ कोर्टाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्तार अन्सारी गँगचा गुंड संजीव जीवा हा तुरुंगात कैद होता. संजीव जीवा याची पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड दहशत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजीव जीवा याला पाच गोळ्या लागल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. संजीव जीवा हा मुझफ्फरनगरमध्ये राहात होता. संजीव जीवा हा मुख्तार अन्सारी गँगचा हिस्ट्री शुटर होता. चर्चेतल्या कृष्णानंद राय हत्या प्रकरणातही संजीव जीवाचा हात होता. 


उत्तर प्रदेशमधल्या गुन्हेगारी जगतातील संजीव जीवा हे गाजलेलं नाव होतं. 90 दशकात त्याने गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकलं. अत्यंत क्रूर असणाऱ्या संजीव जीवाची दहशत पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पसरु लागली. सामान्य लोकांबरोबर पोलिसांमध्येही त्याची दहशत होती. सुरुवातीला त्याने कपाऊंड म्हणून नोकरी केली. पण पैशांच्या लालचेपोटी त्याने दवाखानाच्या संचालकाचंच अपहरण केलं. या प्रकरणात सुटल्यानंतर संजीव जीवाची हिम्मत वाढली. त्याने कोलकाताच्या एका व्यापाऱ्याच्या मुलाचं अपहरण केलं. मुलाच्या सुटकेसाठी त्याने व्यापाऱ्याकडे दोन कोटींची मागणी केली. 90 च्या दशकोत दोन कोटी ही मोठी रक्कम होती.


त्यानंतर त्याने हरिद्वारमधल्या नाजिम गँगमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही दिवस तो सतेंद्र बरनाला गँगसाठी काम करु लागला. वेगळवेगळ्या गँगसाठी काम करत असतानाच त्याने स्वत:ची गँग बनवली. सध्या तो मुख्तार अन्सारी, मुन्ना बजरंगी आणि भाटी गँगसाठी काम करत होता. जवळपास तीन डझन गुन्हे ताच्यावर नावावर आहे. संजीव जीवाला अटक केल्यानंतर त्याल लखनऊ जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. 


संजीव जीवाची पत्नी पालय माहेश्वरीने आपल्या पतीच्या जीवाला धोका असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्यान संजीव जीवाची सुरक्षाही वाढवण्यात आली,पण कोर्टात नेताना वकिलांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी अगदी जवळू त्याला गोळ्या झाडल्या.