Crime News :  पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. राजस्थानमधील चुरूमधील एका विवाहितेवर सासरे, दिराकडून वारंवार लैंगिक अत्याचार झाला. पती चहामध्ये औषध देऊन बेशुद्ध करायचा आणि नवीन नवीन अनोळखी पुरुषांसोबत जाण्यास दबाव टाकायचा. तब्बल 20 वर्षांपासून पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार सुरु आहे. एक दिवस तिने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर नवऱ्याने धारदार शस्त्राने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. तिने आपला जीव वाचवत तिथून पळ काढला. (Crime News Wife was being sold for 20 years 8 people Physical abuse everyday included father in law and brother in law)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील जिल्ह्यातील सांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना आहे. या महिलेला 3 मुले आणि एक मुलगी असून ते सध्या मामाकडे राहत आहेत. लग्नानंतर नवरा जबरदस्ती इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. विरोध केल्यावर मारहाण करायचा. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पीडित महिलेच्या नवरा, सासरे, दिरासह 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 


पीडित महिलेने आरोप केलाय की, 'हे सर्व लोक गेल्या 15-20 वर्षांपासून चहामध्ये नशा टाकून तिच्यावर अत्याचार करायचे. त्याचवेळी तिने याला विरोध केल्यावर तिला बेदम मारहाण करायचे. एके दिवशी पतीने धारदार शस्त्राने महिलेचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. या स्थिती तिने घरातून पळ काढला आणि पोलीस स्टेशन गाठलं.'


पोलिसांना तिने सांगितलं की, 'सर्व आरोपी तिच्या भावालाही जीवे मारण्याची धमकी देत आहेत. तिचं मुलं भावाकडे असल्याने तिला काळजी वाटतं आहे. त्यामुळे कोणतीही घटना घडू शकते म्हणून पोलिसांनी त्वरित कारवाई करावी.' दरम्यान पोलिसांनी सांगितलं की, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असं आश्वासन पीडित महिलेला दिलंय.