Wedding Fashion Tips : पौष महिना संपला आणि सगळीकडे लगीनघाई (wedding season) सुरु झाली. आता ,लग्न म्हटलं की, वधू वरासोबत घरातले सर्वजण सजून-धजून मांडवात उभे असतात. यात विशेषतः महिला वर्गाची जरा जास्तच गडबड असते, प्रत्येकीला सुंदर आणि सर्वांपेक्षा हटके दिसायचं असतं. तुमच्यासोबत असं कधी झालय का, साडी नेसायला काढली आणि ऐनवेळी ब्लाउज फिटिंग बरोबर  होत नाही किंवा सैल होतो मग आपली पंचाईत  होऊन जाते. आणि मग आपला हिरमोड होऊन जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता यावर एक भन्नाट आयडियाची कल्पना सापडली आहे. ( wedding season make ur top blouse fashion hacks) 


हे काही ऑप्शन आहेत ज्यात तुमच्याकडे ब्लाउज नसेल तरीही  तुम्ही साडी नेसू शकता आणि या वेडिंग सिजनमध्ये सर्वात उठून दिसू शकता.  


ब्लॅक क्रॉप टॉप (black crop top)


फ्लोरल प्रिंटची साडी असो किंवा सिल्कची साडी, ती ब्लॅक क्रॉप टॉपवर सहज मॅच करता येते. क्रॉप टॉप साड्यांसोबत सहज मॅच होतात. . फक्त मॅचिंग दागिने आणि परफेक्ट मेकअप करायला विसरू नका.  ब्लॅक क्रॉप टॉप कोणत्याही साडी किंवा लेहेंग्यासोबत मॅच करता येतो. ( wedding season make ur top blouse fashion hacks) )


रफल टॉप (ruffle top)


साडीसोबत मॅचिंग ब्लाउज नसल्यास रफल टॉपसह फ्युजन लूकमध्ये साडी नेसू  शकता. कोणत्याही रफल डिझाइन टॉपला साडीसोबत मॅच करा . हे खूप वेगळे दिसेल आणि स्टायलिश देखील दिसेल.


पफ स्लीव्ह टॉप (puff sleeves top)


पफ स्लीव्ह डिझाईन असलेले टॉप्सही साड्यांसोबत मॅच करता येतात. हा एक अतिशय चांगला पर्याय आहे. जर तुमचे हात जाड किंवा पातळ असतील तर अशा प्रकारच्या स्लीव्ह डिझाइनमुळे तुम्हाला सुंदर लुक मिळेल.


टॅंक टॉप (tank top)


कोणत्याही साडीला काळ्या रंगाच्या टँक टॉपसोबत मॅच करा. ते स्टायलिश दिसेल आणि तुम्हाला वेगळे बनवेल. विशेषत: काळ्या रंगाचे टँक टॉप्स साडीसोबत सहज मॅच करतात. त्यामुळे या लगीनसराईत साडी नेसण्याचा बेत सोडण्याऐवजी यापैकी कोणत्याही टॉपशी साडी मॅच करा. तुम्हाला पूर्णपणे वेगळा लुक मिळेल.