काश्मीर : जम्मू काश्मीरमधील पुलवामाच्या लॅथापोरामध्ये केंद्रीय रिझर्व पोलीस दल (सीआरपीएफ) कॅम्पवरील हल्ल्याचा कट रचणारा आता भारताच्या ताब्यात आहे. 2017 मध्ये सीआरपीएफ कॅंम्पवरील हल्ल्याचा कट रचणारा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी निसार अहमदला संयुक्त अरब अमीरात (UAE) ने भारताला सुपूर्द केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. निसार अहमदला राष्ट्रीय शोध पथक ( एनआयए) ने दिल्लीतील विमानतळावर अटक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तो 1 फेब्रुवारीला यूएईला गेला होता. यूएईने त्याला तिथून ताब्यात घेतले त्यानंतर मंगळवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. निसार अहमद हा कामाच्या विसाची मदत घेऊन पळण्याच्या इराद्यात होता. त्याचा भाऊ, नूर मोहम्मद तांत्र देखील जैश-ए-मोहम्मदचा कमांडर होता. तो गेल्या वर्षी सैन्य दलाच्या कारवाईत मारला गेला. 



लॅथापोरामध्ये 30-31 डिसेंबर 2017 च्या रात्री सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 5 जवान शहीद झाले होते. जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. दहशतवादी संघटनेचा कमांडर नूर त्रालीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचे जैश ए मोहम्मदने सांगितले. 


26 डिसेंबरला सैन्या सोबत झालेल्या चकमकीत जैश ए चा कमांडर नूर त्राली मारला गेला. जम्मू काश्मीरमध्ये बुरहान वाणी नंतर हा दहशतवादाचे दुसरे नाव बनला होता.