नवी दिल्ली : दिल्लीच्या पटेल नगर मेट्रो स्टेशनजवळ ट्राफिक पोलिसांनी एका तरुणाला जबरदस्त मारहाण केली. ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या दंडुकेशाहीवर मोठी टीका होत होती. या व्हिडिओत गर्दीसमोर दोन ट्राफिक पोलीस एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. जेव्हा तो तेथून पळण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा पोलीसही त्याच्या मागे धावतानाही या व्हिडिओत दिसत आहेत. त्यानंतर त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतानाही पोलीस दिसत आहेत.  


 



हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर ट्राफिक पोलिसांनी एक स्टेटमेंट जाहीर करत स्पष्टीकरण दिलंय. स्पेशल कमिशनर ट्राफिक पोलीस दीपेंद्र पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ पटेल नगरचा आहे... आणि या व्हिडिओत मार खाताना दिसणारा तरुण एका तरुणीसोबत होता. त्या तरुणाकडे बाईकचे कागदपत्रं नव्हती. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं एक पोलीस कर्मचाऱ्याल कानाखाली मारली आणि तिथून पळण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याचा पाठलाग केला तेव्हा त्यानं रस्त्यावरच झोपून घेतलं... आणि त्यावेळी हा व्हिडिओ शूट करण्यात आलाय. या घटनेची माहिती देण्यासाठी ट्राफिक पोलिसांनीच १०० नंबरवर पीसीआर कॉल केला होता.