Seat belt warning alarm: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष (tata sons former chairman) सायरस मिस्त्री (54) यांचा कार अपघातात मृत्यू (Cyrus Mistry death) झाला. त्यांच्या मृत्यूने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे. अहमदाबादहून मुंबईकडे येत असताना त्यांची कार पालघरनजीक (Palghar) एका पुलावर डिव्हायडरला धडकली. यात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक तपासात सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट (Seat Belt) लावला नसल्याचं समोर आलं आहे. अतिवेगाने आणि चालकाच्या घेतलेल्या चुकीच्या निर्यणामुळे हा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. (government to change seat belt warning rules in india)


दरम्यान, सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकार कारमधल्या सीट बेल्ट संदर्भातल्या नियमांबाबत पुनर्विचार करत आहे. यात मोठा बदल केला जाण्याचीही शक्यता आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) लवकरच सीट बेल्ट वॉर्निंग अलार्म बंद (Seat belt warning alarm) करण्याच्या यंत्रणेवर बंदी घालणार आहे. 


रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय चार महत्त्वाच्या निर्णयांवर विचार करत आहे. या चार निर्णयांमध्ये सीट बेल्ट बीप अलार्म स्टॉपर्सवर बंदी घालणं, कारमध्ये सहा एअरबॅग्ज (AirBags) अनिवार्य, मधल्या आणि मागील सीटसाठी 3-पॉइंट सीट बेल्ट अनिवार्य आणि सीट बेल्टच्या महत्त्वाबद्दल जागरुकता वाढवणे यांचा समावेश आहे.
 
यासंदर्भात एक आदेश कढला जाण्याची शक्यता असून त्यासंदर्भात प्रक्रिया सुरु आहे. सर्व प्रकारच्या सीट बेल्ट क्लिपवर बंदी घालण्याचा आदेश लवकरच काढला जाऊ शकतो. भारतात विक्री होणाऱ्या बहुतेक कारमध्ये पुढे बसलेल्यांसाठी सीट बेल्ट वॉर्निंग बेल वाजते. पण मागे बसणाऱ्यांसाठी अशी कोणती सुविधा नाही.