मुंबई : आजकाल ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्याचा ट्रेंडच झालाय. खवय्यांना हवं ते चवीला खाण्यासाठी ताबडतोब मिळाव यासाठी मार्केटही फोफोवलंय.मात्र अनेक कंपन्यांच हेच डिलिव्हरी बॉय अनेकदा वादात अडकताना पाहायला मिळाले. असाचं एक वाद आता पुन्हा एकदा रंगला आहे. नेमका का हा वाद काय आहे तो  जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाईन फुड खाण्यासाठी आपण अनेकदा अॅपवरून मागवत असतो. हीच सेवा आणखीण चांगली होण्यासाठी व ग्राहकांशी कनेक्ट राहण्यासाठी कंपनी उत्तमोत्तम सेवा प्रदान करत असते. अशीच एका कंपनीने गेल्या काही वर्षापासून फु़ड डिलिव्हरीच्या अॅपवर विशेष सुचना देण्याचे आवाहन केले आहे. याचा अनेक जण खुप फायदा घेऊन कंपनीला सुचना करत असतात. मात्र हीच सुचना एका ग्राहकामुळे वादात सापडलीय.


काय आहे प्रकरण? 
हैद्राबादच्या तेलंगणातील का ग्राहकाने ऑनलाईन फुड मागवलं होत. 29 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता या ग्राहकाने फूड डिलिव्हरी कंपनीकडून जेवण ऑर्डर केले. त्यानुसार त्यांच्या महादेवपुरीतील घरापासून तीन किमी अंतरावरून जेवणाची ऑर्डर देण्यात आली. ही ऑर्डर केल्यानंतर ग्राहकाने कंपनीला एक विशेष सुचना केली होती. त्याने फुड डिलिव्हरीच्या कमेंट सेक्सशनमध्ये 'मुस्लिम व्यक्तीच्या हातून अन्न पाठवू नका' अशी विनंती केली. ग्राहकाने केलेल्या या विशेष सुचनेचा हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ग्राहकाच्या या मागणीवरून आता मोठा वाद रंगू लागला आहे.  



नेत्यांच्या प्रतिक्रिया 
तेलंगणातील अॅप आणि गिग कामगारांच्या संघटनेचे प्रमुख शेख सलाउद्दीन यांनी याबाबत ट्विट करून संबंधित कंपनीकडून कारवाईची मागणी केली आहे. 


काँग्रेस नेते आणि शिवगंगाचे खासदार कार्ती पी. चिदंबरम यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलीय. फु़ड डिलिव्हरी कंपन्या या प्रकरणात शांत बसू शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे. धर्माच्या नावाखाली गिग कामगारांसोबत होणारा हा कट्टरपणा कंपन्या नुसत्या बघु शकत नाही. त्यांना गिग कामगारांना काय सोसावे लागते हे पाहावे लागेल. गिग कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी या कंपन्या कोणती पावले उचलतील? असा सवाल देखील कार्ती चिदंबरम यांनी केलाय.  


दरम्यान या घटनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याने हा वाद आणखीणचं ऱंगला आहे. या वादावरून आता मोठा वाद सुरु झाला आहे.