युरोपनंतर भारतातही सायबर हल्ला... जेएनपीटीचं कामकाज ठप्प
युरोपियन सायबर हल्ल्यानंतर या दहशतावादाचे भारतातही पडसाद उमटलेत. देशातल्या सर्वाधिक वर्दळीच्या जेएनपीटी बंदरात सायबर हल्ल्यामुळे कामकाज ठप्प झालंय.
मुंबई : युरोपियन सायबर हल्ल्यानंतर या दहशतावादाचे भारतातही पडसाद उमटलेत. देशातल्या सर्वाधिक वर्दळीच्या जेएनपीटी बंदरात सायबर हल्ल्यामुळे कामकाज ठप्प झालंय.
देशातलं सर्वाधिक वर्दळीचं बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उरणच्या जेएनपीटी बंदर ठप्प झालंय. उरणमधल्या जेएनपीटी बंदरातलं कामकाज आज पूर्णपणे बंद आहे.
बंदरातल्या संगणक प्रणालीवर व्हायरलचा हल्ला झाल्यानं कालपासूनच बंदराच्या कामकाजाला फटका बसलाय. सायबर हल्ल्यामुळे बंदरातल्या कंटेनरची ये-जा थांबली आहे.
सायबर हल्ल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनर वाहतूक थांबवण्यात आलीय.