Cyclone Biporjoy News Updates : बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातला मोठा तडाखा दिल्यानंतर हे वादळ आता राजस्थान आणि पाकिस्तानच्या दिशेला सरकले आहे. राजस्थानमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला जोरदार फटका बसला आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरातमधील वादळग्रस्त कच्छ भागाची पाहणी करणार आहेत. राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉयमुळे राजस्थानच्या उदयपूरमध्ये तुफान पाऊस सुरु झालाय. अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. तर गाड्यांचंही नुकसान झाले आहे. त्यामुळे लोकांनी या वादळाची धडकी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे समुद्र किनारी कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. याशिवाय एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्य आणि केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बिपरजॉयमुळे आज द्वारकाधीश मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.


दरम्यान बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, गुरुवारी रात्री गुजरातला धडकलेल्या या चक्रीवादळामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती शुक्रवारी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने महासंचालक अतुल कारवाल यांनी दिली. चक्रीवादळाच्या तडाख्याने 23 जण जखमी झाले असून, कच्छ-सौराष्ट्र विभागाला चक्रीवादळाचा मोठा फटका बसल्याचे सांगण्यात आले. या भागांतील एक हजारांपेक्षा जास्त गावे अंधारात गेली आहेत. विद्युत खांब जमीनदोस्त झाल्याने येथील विद्युत पुरवठा पूर्वत करण्यात वेळ लागणार आहे.


अरबी समुद्रातील चक्रीवादळाने आलेल्या पावसाने कच्छ आणि गुजरातच्या सौराष्ट्र भागातील काही भागांना झोडपून काढले. गुरुवारी सायंकाळी चक्रीवादळ जखाऊ बंदराजवळ धडकण्यास सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण कच्छ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.  



66,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले


बिपरजॉय चक्रीवादळ आज पाकिस्तानातील सिंधला धडकणार आहे. त्यामुळे वादळाचा धोका लक्षात घेऊन 66,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पाकिस्तानच्या हवामान ऊर्जा मंत्री  शेरी रहमान यांनी लोकांना अधिकाऱ्यांना सर्तक राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, सर्व बचाव संस्था मदतकार्यासाठी सज्ज आहेत. 
 
पाकिस्तानच्या हवामान मंत्र्यांनी सांगितले की, थट्टा, सुजावल, बदीन आणि थारपारकर जिल्हे चक्रीवादळामुळे सर्वाधिक प्रभावित होतील. बिपरजॉय कराचीपासून दूर जात आहे. मात्र, चक्रीवादळामुळे अधिकाऱ्यांना पाकिस्तानमधील लहान विमानांचे उड्डान स्थगित केले आहे.  ईशान्य अरबी समुद्रावरील चक्रीवादळ बिपरजॉय गेल्या सहा तासांत जवळपास ईशान्येकडे सरकले आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आता कराचीच्या दक्षिणेस सुमारे 310 किमी, थट्टाच्या 300 किमी दक्षिण-नैऋत्येस आणि केटी बंदरच्या 240 किमी दक्षिण-नैऋत्येस 22.1°N अक्षांश आणि 66.9°E रेखांशावर आहे.