पणजी : तौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनाऱ्यावर धडकले असून, याठिकाणी समुद्रात उंच लाटा उसळ्या आहेत. गोव्याच्या किनाऱ्यावर वादळी वाऱ्याने निसर्गाचे रौद्र रुप धारण केले आहे. वादळासह मुसळधार पाऊस देखील गोव्याच्या किनारपट्टी परिसरात सुरू असल्याने आपत्ती व्यवस्थापनची टीम अलर्ट आहे. किनारी परिसरात कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही याची प्रशासन काळजी घेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चक्रीवादळाबाबत BMC अलर्टवर


ब्रृहन्मुंबई महानगर पालिका तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर अलर्टवर आहे. कोरनो रुग्णांना देखील किनारी भागापासून इतरत्र रुग्णालयात हालवण्यात आले आहे. मुंबईतून मोठ्या गतीने तौक्ते चक्रीवादळ जाण्याची शक्यता आहे.


IMDने दिलेल्या इशाऱ्या नंतर दादरा नगर हवेली, दमन दीव आदी समुद्र किनाऱ्यावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. येथून हे चक्रीवादळ मोठे तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. 18 मेच्या दुपारी पोरबंदर, गुजरातचे तट पार करण्याची शक्यता आहे.


गुजरात किनाऱ्यावर चक्रीवादळ (Cyclone) धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चक्रीवादळामुळे लक्षद्वीप समुद्र भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन रत्नागिरी, (Ratnagiri) आणि सिंधुदुर्गात (Sindhudurg) वादळासह जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचवेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मासेमारी करण्यासाठी कोणीही समुद्रात जाऊ नये, असा इशारा जिल्हा प्रशासनाने मच्छिमारांना दिला आहे. दरम्यान, 'ऑरेंज अ‍ॅलर्ट'चाही इशारा देण्यात आला आहे.


 'ऑरेंज अ‍ॅलर्ट'चा इशारा 
अरबी समुद्राच्या आग्नेय भाग आणि शेजारील लक्षद्वीप भागामध्ये कमी दाबाचा पट्टा होण्याची शक्यता आहे.  याची तीव्रता अधिक वाढून दि. 15 तारखेपर्यंत हे क्षेत्र चक्रीवादळामध्ये रूपांतरित होऊन 18 मेच्या संध्याकाळपर्यंत ते गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या घडामोडी लक्षात घेता आता महाराष्ट्रासाठी इशाऱ्याची तीव्रता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अद्ययावत पूर्वानुमानानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना रविवारी आणि सोमवारी तसेच पुणे जिल्ह्याला सोमवारसाठी  'ऑरेंज अ‍ॅलर्ट'चा इशारा देण्यात आला आहे. येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.