गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गुजरातचा आज दौरा केला. गुजरातमधील 3 जिल्हे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहेत. केंद्रशासित प्रदेश दीव दमनला देखील वादळाचा तडाखा बसला आहे. गुजरातच्या नुकसानग्रस्त भागासाठी केंद्र सरकारने 1000 कोटींची आर्थिक मदत जारी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातला 1000 कोटींचे पॅकेज
पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील नुकसानीची पाहणी केली. अनेक कुटूंब त्यामुळे उद्धवस्त झाली आहेत. त्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली. गुजरातला तत्काळ मदतीसाठी 1000 कोटीची मदत केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली आहे. तिन्ही प्रभावित जिल्ह्यांमध्ये मुलभूत सुविधा आणि पुनर्निमाणासाठी सर्व प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन मोदी यांनी गुजरातला दिले. 


 तौक्ते चक्रीवादळात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. तसेच अनुग्रह मदत केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि केंद्रशासित प्रदेश दीव दमनलाही देण्यात येणार आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गुजरात राज्याचा दौरा केला. पंतप्रधान गिर-सोमनाथ, जाफराबाद, महुआ परिसराचा विमानातून आढावा घेतला. त्यानंतर गुजरात आणि दीवमध्ये देण्यात येणाऱ्या आर्थिक पॅकेजसाठी उच्चस्थिरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आणि आर्थिक पॅकेज जारी केले. गुजरात प्रमाणेच अरबी समुद्राच्या किनापट्टीला असलेल्या राज्यांना केंद्र सरकार आर्थिक मदत देते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.