नवी दिल्ली : दिल्लीतल्या मोतीनगर भागात रंगाच्या कारखान्यात सिलेंडरचा स्फोट झालाय. या घटनेत सात जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत १५ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अवैधरित्या इथे कारखाना सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. दरम्यान, पोलिसांनी कारखान्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कारखान्याच्या आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. रात्री 8 वाजून 48 मिनिटांनी या संदर्भात अग्निशमन दलाला माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमनच्या आठ गाड्या आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सुदर्शन पार्कमध्ये एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही घटना घडली असून यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त (पश्चिम) मोनिका भारद्वाज यांनी दिली. 18 जणांना वाचवण्यात आले असून आचार्य भिक्षू रुग्णालयात दाखल करण्यात आले. ढीगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. खूप लोकसंख्या असलेल्या ठिकाणी ही इमारत आहे. याठिकाणी पंखे आणि पेंटचे काम होत असते. फॅक्टरीचा मालक देखील या घटनेत जखमी झाला आहे.