नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर महागाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे आता गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे.  IOCने फेब्रुवारी महिन्यात 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरचे दर वाढवले आहेत. याआधी 4 फेब्रुवारी आणि त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी सिलेंडरचे दर वाढले होते. एकाच महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडरचे दर वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, डिसेंबर महिन्यात सिलेंडच्या दरात दोन वेळा वाढ झाली होती. 1 डिसेंबर रोजी सिलेंडर 594 रूपयांवरून 644 रूपयांवर पोहोचला. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी घरगुती सिलेंडरसाठी 694 रूपये मोजावे लागत होते. म्हणजे एका महिन्यात सिलेंडरच्या दरात 100 रूपयांची वाढ झाली. त्यानंतर जानेवारी महिन्यात सिलेंडरच्या दरात कोणत्याही प्रकारचा वाढ झाली नाही. 



मात्र फेब्रुवारी महिन्यात 4 तारखेला सिलेंडरच्या दरात 25 रूपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे 4 फेब्रुवारीला सिलेंडरसाठी तब्बल 719 रूपये मोजावे लागत होते. त्यानंतर सिलेंडरच्या दरात  50 रूपयांनी वाढ करण्यात आली. सिलेंडरच्या दरात 50 रूपयांनी वाढ झाल्यानंतर 769 रूपये सिलेंडरसाठी मोजावे लागत होते. आता मात्र सिलेंडरसाठी 794 रूपये मोजावे लागणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात सिलेंडरचे दर 100 रूपयांनी वाढवण्यात आले. एलपीजीच्या किंमती सा्तत्याने वाढत असल्यामुळे भारतातील पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकाला जात आहेत.