नवी दिल्ली : गेल्या सात दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसत आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होत आहे. तरी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. शनिवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७५ रूपये प्रती लिटरवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये शिवराज सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रत्येकी एक-एक रूपये अतिरिक्त कर लावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात ५९ ते ६० पैशांनी वाढ झाली असून डिझेलच्या दरात ५० ते ६० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पेट्रोल ३.९० रूपये प्रती लिटर तर डिझेल चार रूपये प्रती लिटर झाला आहे. पेट्रोल  डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 


दिल्लीत पेट्रोलचे आजचे दर ७५ रूपये प्रती लिटर आहे.  तर डिझेल ७३.३९ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे. मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबईत  पेट्रोलचे आजचे दर ८२.१० रूपये प्रती लिटर आहे.  तर डिझेल ७२.०३ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे.


चेन्नई आणि कोलकातामध्ये पेट्रोलचे दर क्रमशः ७८.९९रूपये आणि ७७.०५ प्रती लिटर आहे. डिझेलचे दर क्रमशः ७१.६४ रूपये  आणि ६९.२३ रूपये प्रती लिटर आहे.