Dalai Lama on Tibet and China : दलाई लामा. सध्याच्या धावपळीच्या जीवनात एकाग्रता, शांतता आणि यांसारख्या अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी हेच दलाई लामा एका मोठ्या वर्गाला मार्गदर्शन करतात. त्यांचे उपदेश आणि त्यांच्या संदेशांचं पालन अनेकजण करतात. फक्त बौद्ध धर्मीयच नव्हे, तर इतरही विविध धर्मातील मंडळी जगण्याची कला शिकण्यासाठी दलाई लामा यांचे उपदेश आचरणात आणताना दिसतात. याच दलाई लामा यांचं नाव सध्या एका वेगळ्या कारणामुळं चर्चेचा विषय ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमधील सद्यस्थिती आणि स्थानिक राजकारणाबाबत त्यांनी नुकतंच एक मोठं वक्तव्य केलं असून, ही मंडळी सध्या चीनकडून अधिक स्वायत्ततेची अपेक्षा ठेवतात असं ते म्हणाले. आपण ल्हासा येथे जाऊ इच्छितो पण, धरमशाला (Himachal Pradesh) ही आपल्या आवडीची जागा आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. याचवेळी त्यांनी भारत आणि चीन यांच्यामधील मध्यस्तीसंदर्भातही वक्तव्य केलं. पण, चीननं मात्र त्यांच्या या वक्तव्याला दुजोरा दिला नाही. किंबहुना चीनकडून आजही दलाई लामा यांच्यावर फुटिरतावादाला खतपाणी देण्याचा आरोप लावला जातो. 


चीनबद्दल का बदलले दलाई लामा यांचे सूर? 


चीन सध्या बदलतंय. तिथल्या नागरितांना माहितीये की तिबेटमधील अनेकजण त्यांच्यावर प्रेम करतात. चीनची मोठी लोकसंख्याही तिबेटच्या जनतेकडे आपुलकीच्या भावनेनं पाहते, असं लामा म्हणाले. 


हेसुद्धा वाचा : LIC ची 'ही' पॉलिसी 30 सप्टेंबरला बंद होणार; तुम्ही यात पैसे गुंतवलेयत का?  


 


चीनमधील अनेकांनाच आपण तिबेटला जावं असं वाटतं, हो पण त्यांना इथं राहायचं नाहीये. राहिला विषय ल्हासाचा तर, हे ठिकाण अधिक उंचीवर असून, धरमशाला ज्या उंचीवर आहे ते अंतर तुलनेनं शरीरासाठी अधिक फायद्याचं आहे. इथं लामा यांचं वक्तव्य तिबेटच्या वातावरणात वास्तव्याच्या प्रत्यक्ष परिस्थितीशी जोडणाऱ्या विचारांना अधोरेखित करतो. पण, तरीही चीनसंदर्भातील त्यांची ही मंत अनेकांच्या भुवया उंचावून गेली आहेत. 


दलाई लामा यांचा बहुचर्चित दौरा 


केंद्रीय तिबेटन प्रशासनाच्या माहितीनुसार 2 ऑक्टोबरपासून दलाई लामा धरमशाला येथे दैनंदिन उपदेश देण्यास सुरुवात करतील. त्यानंतर 10 ऑक्टोबरला ते भारत- चीनमधील तणावग्रस्त वातावरणामध्येच गंगटोक येथे जातील. जिथं डोकलामनजीक एके ठिकाणी त्यांच्या प्रवचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानंतरच्या काळात ते कर्नाटकातील बायलाकुप्पेच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तिबेटन नागरिकांची मोठी वस्ती अणाऱ्या या भागात दलाई लामा यांचा दौरा होणार असून, यादरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासुद्धा दौऱ्यात सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.