मुंबई : सध्या सर्वत्र लग्न धुमधड्यात सुरु आहेत. अशात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे लग्नात डान्स नसेल, तर त्या लग्नाला काही धमाल नसते. लग्नात वऱ्हाडी तुफान डान्स करतात. शिवाय वधू-वराच्या डान्सकडे देखील पाहुण्यांचं लक्ष असते. पण आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये वधू-वर नाही, तर वहिनी दीरासोबत थिरकताना दिसत आहे. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वहिनी आणि दीराची धमाल केमिस्ट्री सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये वहिनी आणि दीर हरियाणवी गाण्यांवर जबरदस्त डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. 



दीर आणि वहिनीने ज्या गाण्यावर ठेका धरला आहे, त्या गाण्याचे बोल आहेत 'तने सोडुंगी...' वहिनी आणि दीराचा व्हिडीओ अंकित जांगीड नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.


हा व्हिडिओ एक वर्ष जुना असला तरी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 1.4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि चाहते व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.