लुधियाना : कोरोना विषाणूचे  (Coronavirus) वाढता धोका लक्षात घेता पंजाबमधील दोन जिल्ह्यात नाईट कर्फ्यू (night curfew) लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू असेल. दोन्ही जिल्ह्यांतील कोरोनाचे नवीन रुग्ण सापडल्यानंतर ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  (Night Curfew In Punjab)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबमधील लुधियानाच्या जिल्हा प्रशासनाने रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. आजपासून 12 मार्च 2021 पासून लुधियानात संचारबंदी लागू होईल. रात्री सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर जाण्यास बंदी घालण्यात येईल. रात्री 11 ते रात्री 5 या वेळेत रात्रीचा कर्फ्यू  (Night Curfew) लागू राहील.



त्याचप्रमाणे पंजाबच्या पतियाला शहरात रात्रीची संचारबंदी ( (Night Curfew) लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या वेगाने वाढणार्‍या घटनांमध्ये प्रशासनाने हा निर्णय घेतला. येथेही रात्री घराबाहेर पडण्यावर बंधन असेल. जे  रात्रीच्या संचारबंदीचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल.


दरम्यान, पोलीस, सैन्य कर्मचारी, सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय आपत्कालीन आणि सरकारी किंवा खासगी मालमत्तेच्या संरक्षणासाठी आपत्कालीन सेवा नाईट कर्फ्यूमधून सूट देण्यात येईल. 


याशिवाय रात्रीच्या कर्फ्यूमध्ये एका राज्यातून दुसर्‍या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसर्‍या राज्य महामार्गाकडे जाणाऱ्यांना सूट मिळणार आहे. तथापि, शहरांमध्ये आत जाण्यास मनाई आहे. जो कोणी कोविड-19 चे नियम मोडणाऱ्यावर कडक शिक्षा करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.