इंदूर : पोलिसांना देखील धक्का बसला जेव्हा त्यांना एका लॅबमधून फेंटालीन नावाचं एक घातक रसायन जप्त केलं. कारण हे रसायन इतकं घातक आहे की काही मिनिटात एकाच वेळी 50 लाख लोकांचा जीव घेऊ शकतो. हे रसायन युद्धात वापरलेले जाते. पण भारतात हे रसायन पहिल्यांदाच सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॅबचा मालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय आणि संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या टीमने संयुक्तपणे ही कारवाई केली. आरोपी हा पीएचडी असल्याचं देखील समोर आलं आहे.


सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॅबचा मालक एक व्यापारी असून उच्चशिक्षित देखील आहे. पण आणखी एक गोष्ट समोर आली ती म्हणजे त्याचा अमेरिकेवर खूप राग आहे. त्याचा साथीदार हा मेक्सिकोचा नागरिक आहे. एकाच वेळी 50 लाख लोकांचा जीव घेणारं हे रसायन भारतात आलंच कसं आणि ते तयार करण्यासाठी सामग्री मिळाली कशी या प्रश्नावरुन आता पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


युद्धात होतो वापर


त्वचेवरील डाग काढण्यासाठी इंजेक्शनमधून या रसायनाचा वापर होतो. पण त्याचा सर्वाधिक वापर हा युद्धात केला जातो. बंदुकीच्या पुढच्या बाजुला या रसायनात कापड ओला करुन लावला जात असे. त्यानंतर बंदुकीतून फायरींग केली जात असे. चीन, रशिया आणि इस्रायल या देशामध्ये याचा वापर होत असे.


तपास यंत्रणांना पडला प्रश्न


भारतात फेंटालीन हे रसायन पहिल्यांदाच आढळलं आहे. 4 वेगवेगळ्या रसायनांच्या मदतीने हे फेंटालीन रसायन तयार केलं जातं. पण ते सहज कोठेही उपलब्ध होत नाही. त्यामुळे आरोपींनी हे रसायन बनवलं कसं याचा प्रश्न तपास यंत्रणांना पडला आहे. या प्रकरणात आणखी चौकशी सुरु आहे.