मुंबई : सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कन्टेन्ट पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे कॉमेडीपासून ते सायन्स, टेक, क्राफ्ट सारखे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये काही स्टंट बाजीचे व्हिडीओ देखील असतात. जे आपल्या अंगावर काटा आणणारे असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी अनेक तरुण मंडळी आहेत, ज्यांना स्टंटबाजी करायला आवडते. पण, स्टंट करणं तसं सोपं नाही. यासाठी खूप सराव आणि एकाग्रतेची गरज असते. त्यामुळे ते सर्वांना करता येणं शक्य नाही. ही स्टंटबाजी करताना अनेकांना दुखापत झाली आहे, तर अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. ज्यामुळे असे स्टंट करताना नेहमीच काळजी घ्यावी.


सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो खूपच वेदनादायी आहे.


व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या मित्रांसमोर स्टाईल मारण्यासाठी स्टंटबाजी करत आहे. पण, त्याच्यासोबत असं काहीसं घडतं, जे पाहून तुम्ही तुमचा श्वास रोखून धराल.


हा व्हिडीओत एक तरुण स्वीमिंगपूलमध्ये उडी मारण्यासाठी थोड्या दुरवरुन धावून येतो आणि उडी मारतो. परंतु तो त्या पाण्यात पडण्याऐवजी स्वीमिंगपूलच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचतो आणि जोरात त्या कडेवरती आदळतो.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओपाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की, या तरुणाला किती मोठी दुखापत झाली असावी. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर parkour_tribe नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला लोकांनी जोरदार शेअर केलं आहे. तर अनेकांनी यावर कमेंट देखील केल्या आहेत.