दार्जिलिंग : स्वतंत्र गोरखालँडसाठी सुरु असलेले आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चाललंय. एका गोरखा समर्थकाचा मृतदेह सापडल्यानंतर संतप्त जमावाने सोनाडा इथलं दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचे स्टेशन पेटवून दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल रात्री पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृ्त्यू झाला होता. त्यानंतर गोरखालँड समर्थकांनी एका पोलीस ठाणे आणि टॉय ट्रेनलाही आग लावलीय.


या आंदोलनात तीन नागरिकांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर दार्जिलिंगमध्ये लष्कराच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्यात. 

गोरखा जनमुक्ति मोर्चा (जीजेएम) कार्यकर्ते आणि गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट (जीएनेलएफ) यांच्यात दार्जिलिंगच्या सोनादा आणि चौकबाजारमध्ये हाणामारी झाली. या पर्वतीय क्षेत्रात सलग २४ व्या दिवशी अनिश्चितकालीन बंद सुरू राहिला. 


दार्जिलिंगमध्ये पेटलेल्या हिंसाचारावरुन जोरदार राजकारणही रंगतंय. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्यात. केंद्र सरकार मदत करत नसल्याचा आरोप यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलाय.