नवी दिल्ली: भारत आणि फ्रान्स यांच्यातील राफेल विमान खरेदी व्यवहार संपूर्णपणे पारदर्शक असल्याचे स्पष्टोक्ती मंगळवारी दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी दिली. 'एएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राफेल व्यवहाराबाबत करण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे या मुलाखतीनंतर दसॉल्टकडून भारताला देण्यात येणाऱ्या राफेल विमानांची झलक दाखवण्यात आली. या एका विमानाची किंमत जवळपास ७०० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे साहजिकच अनेकांना या विमानाबद्दल उत्सुकता होती. अखेर या विमानाची पहिली झलक जगाला पाहायला मिळाली. 


फ्रान्सच्या इस्त्रे त्रे ट्युब या हवाईतळावर खास भारतासाठी तयार करण्यात आलेल्या राफेल विमानाने उड्डाण केले. काही हवाई प्रात्यक्षिके सादर करून हे विमान पुन्हा धावपट्टीवर उतरले.