मुंबई : अमर शहीद दीपक नैनवाल यांच्या अंत्यदर्शनासाठी मंगळवारी सगळेजण उपस्थित होते. 10 एप्रिल रोजी कश्मिरच्या अनंतनाग दहशतवाद्यांशी दोन हात करताना जवान दीपक नैनवाल शहीद झाले. शहीद जवानाच अंत्यदर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील लोकं उपस्थित होते. यावेळी जवानाची लहान मुलगी असं काही बोलली की तेथे उपस्थित असलेल्यांना खूप मोठा धक्का बसला आणि सगळ्यांचेच डोळे पाणावले. 


असं काय म्हणाली मुलगी 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहीद जवान दीपक नैनवाल यांची लहान मुलगी अंत्यदर्शनासाटी आली. त्यावेळी सगळ्यांना रडू कोसळलं. मुलगी लावण्या वडिलांच दर्शन घेताना म्हणाली की, आता पप्पा आकाशातील तारा झाले आहेत. जेव्हा वाटेल तेव्हा आपण त्यांना बघू शकतो. हे शब्द कानी पडताच सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. सगळ्यांनाच आपलं रडू अनावर झालं. 


यावेळी उपस्थितांनी देखील, जब तक सूरज चांद रहेगा दीपक तेरा नाम रहेगा और पाकिस्तान मुर्दाबाद असे नारे दिले. तसेच यावेळी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांनी शहीद जवानाच्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याच सांगितलं असून इतर मदत करण्याचा शब्द दिला आहे.