Crime News : राजस्थानमध्ये (Rajasthan Crime) महिलांवरील अत्याचारांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलिसच (Rajasthan Police) क्रूरकृत्य करत असल्याचं समोर आलं आहे. माणुसकीला लाजवेल असा एक राजस्थानच्या दौसा येथून समोर आले आहे. राजस्थानमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) एका चार वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार केले. दौसातील राहुवास पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने परिसरातील लोकांचा संताप वाढला आहे. दुसरीकडे विरोधकांनीही सत्ताधारी काँग्रेसला घेरलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या गणवेशाला पुन्हा एकदा काळीमा फासला गेलाय. दौसात भूपेंद्र सिंह नावाच्या पोलीस उपनिरीक्षकाने 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये रोष आहे. हे संपूर्ण प्रकरण लालसोट विधानसभा मतदारसंघातील राहुवास गावात हा सगळा प्रकार घडला आहे. दौसाच्या पोलीस अधिक्षक वंदिता राणा यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनिरीक्षक भूपेंद्र सिंह यांना राहुवास पोलीस ठाण्यामध्ये ड्युटीसाठी पाठवले होते. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.


दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची भाड्याची खोली घेऊन उपनिरीक्षक भूपेंद्र सिंह राहत होता. यादरम्यान एक चार वर्षांची निष्पाप मुलगी त्या भाड्याच्या खोलीजवळ खेळत असताना उपनिरीक्षकाची नजर त्या निष्पाप मुलीवर पडली. यानंतर त्याने त्या मुलीला आपल्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो लोकांनी राहुवास पोलीस ठाण्यासमोर येऊन आरोपी उपनिरीक्षकाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी  केली. यानंतर काही गावकऱ्यांनी मिळून आरोपी पोलिसाला मारहाण केल्याचेही म्हटलं जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षांची मुलगी खेळण्यासाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपी उपनिरीक्षकाने मुलीला आमिष दाखवून आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलगी रडत रडत तिच्या आईकडे आली आणि तिने झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीचे वडील पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले होते. पोलिसांनी उलट मुलीच्या वडिलांना पकडून तुरुंगात टाकले. त्यानंतर  मुलीच्या वडिलांना मारहाण करून त्यांचा हात तोडला. यानंतर पोलीस उपनिरीक्षकाने मुलीच्या वडिलांना मुलीला आंघोळ घालण्यास सांगितले जेणेकरून पुरावा पुसला जाईल.