मुंबई : सरकारी तेल कंपन्यांकडून आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. आज डिझेल 28 ते 30 पैश्यांनी तर पेट्रोलच्या दरांत जवळपास 26 पैश्यांनी वाढ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईत पेट्रोलने शंभरी ओलांडली  आहे. दिवसागणिक पेट्रोलचे दर वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या महिन्याचं गणित देखील कोलमडत आहे. जाणून घ्या चार मेट्रो शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

4 मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर 
शहर               आजचे दर        
दिल्ली                93.94       
मुंबई                 100.19 
कोलकाता          93.97 
चेन्नई                 95.51


4 मेट्रो शहरातील डिझेलचे दर 
शहर              आजचे दर 
दिल्ली               84.89
मुंबई                92.17
कोलकाता         87.74
चेन्नई                89.65


पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.