मुंबई : वडील जवळपास 30 वर्षापासून पोलीस खात्यात आहेत. तर मुलगी 4 वर्षांपूर्वी पोलीस खात्यात लागली आहे. पण रविवारी जेव्हा दोघे एकमेकांच्या समोर आले तेव्हा वडिलांनी मोठ्या अभिमानाने मुलीला सल्यूट केला. पोलीस उपायुक्त ए.आर. उमामहेश्वरा शर्मा  यांना आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी सिंधू शर्माला सल्य़ूट करतांना खूप अभिमान वाटत होता कारण सिंधू आता तेलंगणातील जगतियाल जिल्ह्याची पोलीस अधीक्षक झाली आहे. पुढच्या वर्षी वडील सेवानिवृत्त होत आहेत.  शर्मा हे सध्या हैदराबादमध्ये राशाकोंडा कमिश्नरीमध्ये मलकानगिरीचे पोलीस उपायुक्त आहेत. तर त्यांची मुलगी 2014 बॅचची आयपीएस आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलगी आणि वडील तेलंगणा राष्ट्र समितीच्या जनसभेक एकमेकांसमोर आले. उप-निरीक्षक म्हणून करिअरची सुरुवात करणारी आय़पीएस उमामहेवश्वरा म्हणते की, 'आम्ही पहिल्यांदा ऑन ड्यूटी एकमेकांसमोर आलो. मी खूप नशीबवान आहे की मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.'



वडील म्हणतात की, 'ती माझी वरिष्ठ अधिकारी आहे. मी जेव्हा तिला बघतो तिला सल्यूट करतो. आम्ही एकमेकांची ड़्यूटी करतो पण यावर चर्चा कधीच नाही करत. घरी आम्ही वडील आणि मुलगी असंच राहतो.' सभेत महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सिंधू सांभाळत होती. तिने म्हटलं की, 'मी खूप आनंदी आह. ही चांगली वेळ होती जेव्हा आम्हाला एकत्र काम करण्य़ाची संधी मिळाली.'