ग्वालियर : 'देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण तशी आपल्या सर्वांच्याच परिचयाची. या म्हणीचा प्रत्यय मध्यप्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यात आला. त्याचे झाले असे...


चकीत करणारी घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवम द्विवेदी नावाच्या व्यक्तीच्या पत्नीने नोव्हेंबरमध्ये एका मुलीला जन्म दिला. काही दिवसांनंतर त्या मुलींची तब्येत बिघडली. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. त्यानंतर तिला घरी आणण्यात आले. मात्र पुन्हा तिची प्रकृती बिघडली मग तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. त्या मुलीच्या वडीलांनी सांगितले की, तिचा मेंदू आणि शरीराचा काही भाग काम करत नव्हता. त्यामुळे तिला मृत घोषित करण्यात आले. मात्र तिला स्मशानात घेऊन जात असतानाच असे काही झाले की ते ऐकून तुम्ही चकीत व्हाल.


अन् ती जिवंत झाली...


हॉस्पिटलमधून घरी आणल्यावरही त्या मुलीचा श्वास चालू होता. तिच्या शरीराची हालचाल होत होती. मात्र कुटुंबियांनी तिला मृत समजले आणि अंतिम संस्कार करण्यासाठी तिला स्मशानात नेण्यात आले. मात्र तिला गाढण्यासाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यात जेव्हा तिला ठेवले तेव्हा तिने डोळे उघडले आणि तिच्या हाता-पायांची हालचाल होऊ लागली. ते पाहुन कुटुंबिय चकीत झाले.


डॉक्टरांनी सांगितले की...


त्यानंतर मात्र तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आता तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगतिले आहे. मुलीला निमोनिया झाला असून तो ताप डोक्यात गेला आहे. त्यामुळे तिची प्रकृती गंभीर आहे. म्हणून तिला व्हेटींलेटरवर ठेवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.