Odisha : ओडिशामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा किशोर दास (Health Minister Nab Kishore Das) यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने नाबा किशोर दास यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहे. नाबा किशोर दास ब्रजराजनगरमध्ये एका कार्यक्रमाला जात असतानाच पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्यावर गोळीबार का केला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र गोळी छातीत लागल्याने नाबा किशोर दास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नाबा किशोर दास यांची एका सहायक उपनिरीक्षकाने गोळ्या झाडल्या. रविवारी ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील गांधी चौकात पोलिसांच्या गणवेशातील एएसआयने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने मंत्र्यांवर गोळीबार केला. मंत्री नाबा दास यांची गाडी थांबली असता कार्यकर्त्यांना त्यांना हार घातला. तितक्यात पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या छातीत गोळी झाडली. गोळी लागल्याचे कळताच दास पुन्हा गाडीत बसले आणि पुन्हा बाहेर आले. यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली.



पोलीस कर्मचाऱ्याने नबा दासवर 5 राऊंड फायर केले आहेत. गोळी लागल्यानंतर दास यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्लान आधीच तयार केला होता. मात्र, हा हल्ला कशामुळे झाला, त्याची माहिती मिळू शकली नाही.