नवी दिल्ली : संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महामारीचा सामना करतंय. दरम्यान फंगसला वैज्ञानिक घाबरलेले आहेत. ही महामारी कोरोनापेक्षा जास्त हाहाकार माजवू शकते. फंगसचे नाव 'कॅंडीला ऑरिस' असे आहे. ब्लॅक प्लेग पसरण्याचे हे कारण होऊ शकते. हा फंगस खूप भयानक मानला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनापेक्षा जास्त नुकसान पोहोचवू शकेल इतका भयानक फंगस असल्याचे वैज्ञानिक सांगतात. कारण हा वेगाने पसरतो. फंगसहा एंटीफंगल औषधांना निरुपयोगी ठरवतोय आणि दिवसेंदिवस अधिक प्रभावी होतोय असे डिसीस कंट्रोल आणि प्रिवेंशन सेंटरमधील वैज्ञानिकांनी सांगितले. फंगस रुग्णालयात पसरला तर खूप भयानक स्थिती होईल असेही वैज्ञानिकांनी सांगितले.



2009 मध्ये पटली ओळख


फंगस हा खूप मोठ्या काळापर्यंत स्वत:ला जिवंत ठेऊ शकतो असे लंडनमधील इंपिरियल कॉलेजमधील महामारी विशेषतज्ञ जोहाना रोड्स यांनी सांगितले. 2016   मध्ये इंग्लंडमध्ये पसरलेला फंगस नियंत्रणात आणण्याच्या टीममध्ये रोड्स होते. हा रोग वानरांपासून पसरतो म्हणून याची तुलना ब्लॅक प्लेगशी केली जात असल्याचे ते म्हणाले.


आरोग्य व्यवस्थेत सुधाराची गरज 


कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला आरोग्य सेवेत बदल करण्यास भाग पाडलं. आरोग्य सेवेतील दुर्लक्षित भाग यात समोर आलेयत. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. कारण येणाऱ्या काळात भयानक महामारी पसरु शकतात. यामध्ये पर्यावर परिवर्तनाची भूमिका महत्वाची असणार आहे. अशावेळी आरोग्य सेवांमध्ये प्राधान्याने बदल करणं गरजेचं आहे.