मुंबई : टीव्ही विश्वामध्ये एका धक्कादायक बातमीने चांगलीच खळबळ उडाली आहे. टीव्ही अभिनेता प्रतीश मेहता यांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी रात्री ८ वाजता राजकोट मधील घरात तिने अखेरचा श्वास घेतला. प्लास्टिकच्या खेळण्यासोबत खेळत असताना तिचा मृत्यू झाला. खेळण घश्यात अडकल्याने तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक खेळणं गिळल्यामुळे चिमूरडीला श्वास घेण्यास अडथळे निर्माण झाले. श्वास कोंडल्यामुळेतिचा मृत्यू झाला. अथक प्रयत्नांनंतरही तिला वाचवणे शक्य झाले नाही. मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच प्रतीश आपल्या घरी परतले.   



  आतापर्यंत प्रतीश यांनी अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. 'तारक मेहता का उलटा चष्मा', 'क्राईम पेट्रोल' आणि 'प्यार के पापड' अशा अनेक मालिकामध्ये त्यांनी अभिनय केला .