जयपूर : राजस्थानमध्ये देखील स्वाईन फ्ल्यूचं थैमान आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे मृतांचा आकडा वाढत आहे. भीलवाडामधील मांडलगडच्या भाजप आमदार किर्ती कुमारी यांचा देखील स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे. मांडलगडच्या बिजौलिया राजघराण्याच्या राजकुमारी कीर्ती या ३ वेळा भाजपच्या आमदार म्हणून निवडूण आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किर्ती कुमारीला पाच दिवसांपासून सर्दी-खोकला होता आणि त्यांच्यावर उपचार सुरु होता. रविवारी कोटा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. त्यानंतर कोटातून जयपूर एसएमएस रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांची प्रकृती आणखी बिघडल्यामुळे मग त्यांना पुन्हा जयपूरच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी त्यांचा मात्र दुर्दैवी अंत झाला.


आमदार किर्ती कुमारी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच मांडलगड विधानसभा क्षेत्र आणि त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे. बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात दुखाचं वातावरण आहे. भाजप आमदाराच्याच मृत्यूनंतर सरकारला प्रश्न विचारला जात आहे की स्वाईन फ्ल्यूवर ठोस उपाययोजना का करण्यात येत नाही आहे.