विशापट्टणम : आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणममध्ये विषारी वायू गळती झाली. या दुर्घटनेतील बळींचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. वायू गळतीची झळ आजुबाजुंच्या गावांना पोहोचली आहे. त्यामुळे खबरदारी घेत पाच गावे खाली करण्यात आली आहेत. दरम्यान वाळू गळती रोखत येथील परिस्थित नियंत्रणात आणण्यात यश आले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे आज पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायू गळती झाली होती. यावेळी सहा जणांचा मृत्यू झाला होता. आता यात आणखी दोघांची भर पडली आहे. यामुळे मृत्यांचा आकडा आठ वर पोहोचला. तर शेकडोजणांना वायू गळतीचा त्रास जाणवू लागला आहे. दरम्यान, एनडीआरएफच्या पथकाकडून  मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.



कोरोनाचे संकट असल्याने येथेही लॉकडाऊन सुरु होते. मात्र, राज्य  सरकारकडून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर आज पहाटे ही कंपनी पुन्हा सुरु करण्यात आली. त्यावेळी काही कामगार प्लांट सुरु करण्याच्या तयारीत होते. तेव्हा अचानक विषारी वायूच्या गळती झाली. यामुळे अनेक कामगारांना वायू गळतीचा त्रास जाणवून लागला. काही जण गुदमरलेत. तर काही बेशुद्ध पडलेत. आतापर्यंत सुमारे १५० पेक्षा जास्त जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २० जण गंभीर आहेत.  


वायू गळतीचा त्रास लहान मुलांना आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. या सर्वांना श्वास घेण्यात समस्या येत आहे. अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  घटनास्थळी अग्निशम विभागाचे जवान, रुग्णवाहिका आणि पोलीस दाखल झाले आहेत. दरम्यान, वायू गळतीवर आता नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.