Debit-Credit Card Rules: क्रेडिट आणि डेबिट कार्ड (Debit-Credit Card) वापरणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आजच्या काळात प्रत्येक दुसरी व्यक्ती डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरत आहे. अशा स्थितीत कोणताही बदल होण्याआधी त्याची माहिती घेतली पाहिजे. 1 ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँक कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून बँकिंग क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यासाठी आरबीआयने आदेशही जारी केला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले आहे की ती 1 तारखेपासून कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन (CoF Card Tokenisation)  नियम आणत आहे.


Debit-Credit Card मोठा फायदा


Debit-Credit कार्डधारकांना मोठा फायदा होईल टोकनायझेशन पद्धतीत बदल केल्यानंतर कार्डधारकांना अधिक सुविधा आणि सुरक्षा मिळणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. कार्डधारकांचा पेमेंट अनुभव मोठ्या प्रमाणात सुधारेल. त्यामुळे धोक्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे.


RBI ने दिली ही माहिती


रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन नियमांचा उद्देश क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करणे हा आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या येत होत्या, मात्र नवीन नियम लागू झाल्यानंतर ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डने ऑनलाइन, पॉइंट ऑफ सेल (POS) किंवा अ‍ॅपवर व्यवहार करतील. तपशील एनक्रिप्टेड कोडमध्ये जतन केले जातील.


Debit-Credit Cardमध्ये हा बदल  


तुम्ही Debit-Credit कार्ड टोकनमध्ये बदल करु शकाल. नवीन टोकन सिस्टम अंतर्गत डेबिट आणि क्रेडिट कार्डचा संपूर्ण डेटा 'टोकन'मध्ये बदलला जाईल. यामुळे तुमची कार्ड माहिती एका डिव्हाइसमध्ये लपवली जाईल. जर कोणतीही व्यक्ती टोकन बँकेवर विनंती करू शकते आणि कार्डचे टोकनमध्ये रुपांतर करू शकते. कार्ड धारकाला कार्ड टोकन करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तुम्ही तुमचे कार्ड टोकनमध्ये रूपांतरित केल्यास, तुमच्या कार्डची माहिती कोणत्याही शॉपिंग वेबसाइट किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवर टोकनमध्ये सेव्ह केली जाऊ शकते.