सूर्य पृथ्वीला गिळणार! कसा होणार सूर्याचा अंत? शास्त्रज्ञांनी केला खुलासा

End of The Sun: खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीसारखा दिसणारा एक ग्रह सापडला आहे. त्या ग्रहावरून कोट्यावधी वर्षांनी पृथ्वी नष्ट झाल्यावर कशी दिसेल याचे भयावह चित्र समोर येते. 

Oct 01, 2024, 17:16 PM IST

The sun will swallow the earth: पृथ्वीसारखाच दिसणारा हा ग्रह एकेकाळी राहण्या योग्य होता. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तसा तो एका ताऱ्याची परिक्रमा करत होता असं मानलं जात आहे. खगोलशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ज्या ताऱ्याभोवती हा ग्रह फिरत होता त्या ताऱ्याचा अब्जावधी वर्षांपूर्वी भयावह अंत झाला. ज्यामुळे हा ग्रह अंतराळात आणखी दूर फेकला गेला. 

1/7

काही संशोधनांवरून असे समोर आले आहे, की सुमारे एक अब्ज वर्षांत सूर्यही त्याच्या अंताची प्रक्रिया सुरू करेल. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे, की जेव्हा ही प्रक्रिया सुरू होईल तेव्हा पृथ्वीची अवस्थाही त्या ग्रहा सारखी असेल. जर्नल नेचर ॲस्ट्रॉनॉमीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, 2020 मध्ये पृथ्वीसारखा एक ग्रह सापडला होता. हा नवीन ग्रह आणि त्याचा तारा पृथ्वीपासून सुमारे 4,000 प्रकाशवर्षे दूर असून आकाशगंगेच्या मध्यवर्ती आहे. 

2/7

2020 नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठातील

खगोलशास्त्रज्ञांच्या पथकाने केक 10-मीटर दुर्बिणीचा वापर करून सुमारे तीन वर्षांनंतर ग्रहाचा पुन्हा अभ्यास केला. हा पृथ्वीच्या आकाराचा ग्रह पांढऱ्या किंवा दाट, उष्ण केंद्र असलेला ताऱ्याभोवती फिरतो. ज्याचा आता अंत झाला आहे. असा अंदाज आहे की ताऱ्याचा अंत होण्यापूर्वी ही ग्रह प्रणाली सूर्याभोवती फिरत असलेल्या पृथ्वीसारखी असावी. कोट्यवधी वर्षांपूर्वी या ग्रहावर जीवन असण्याचीही शक्यता आहे.

3/7

खगोलशास्त्रज्ञांनी 2020 मध्ये या ग्रहाला पाहिले होते तेव्हा तो एका लांबच्या ताऱ्यासमोरून गेला होता. ज्यामुळे त्याची चमक 1 हजार पटीने वाढली. याला ‘मायक्रोलेन्सिंग इव्हेंट’ म्हणतात. जेव्हा एखादी ग्रह प्रणाली ताऱ्यासमोरून जाते, तेव्हा ताऱ्यावरून येणाऱ्या प्रकाशावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ग्रहाच्या प्रणालीचे गुरुत्वाकर्षण लेन्ससारखे कार्य करते. कोरिया मायक्रोलेन्सिंग टेलिस्कोप नेटवर्कच्या संशोधकांनी या घटनेचे विश्लेषण केले. त्यात असे आढळले की पृथ्वीच्या आकाराचा तो ग्रह आणि तारा यांच्यातील अंतर जवळपास पृथ्वी आणि सूर्यातील अंतरा एवढेच आहे. पण हे ग्रह कोणत्या प्रकारच्या ताऱ्याभोवती फिरत हे आहेत निश्चित झालेले नाही. 

4/7

अब्जावधी वर्षांनी सूर्याचाही अंत होईल

शास्त्रज्ञांच्या मते आपल्या सूर्याचा शेवटही त्या ताऱ्याच्या अंता सारखाच असेल. पण त्यासाठी अजून एक अब्ज वर्षे बाकी असल्याचे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे.

5/7

पण ही प्रक्रिया सुरू झाल्यावर काय होईल?

याबाबत शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की सूर्याच्या अंतामुळे पृथ्वीवरील महासागरांचे बाष्पीभवन होईल. म्हणजेच पृथ्वीवर पाणी शिल्लक राहणार नाही आणि पृथ्वीच्या कक्षेची त्रिज्या दुप्पट होईल. 

6/7

सूर्य पृथ्वीला गिळंकृत करेल का?

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जेव्हा सूर्याचे आयुष्य संपुष्टात येईल, तेव्हा तो लाल विशालकाय रूप घेईल आणि फुग्यासारखा फुगेल. असे मानले जाते की त्याच्या शेवटच्या टप्प्यात सूर्य बुध आणि शुक्र हे ग्रह गिळेल आणि त्यांना जाळून टाकेल. यामुळे पृथ्वीसारखे जीवन असलेले ग्रह त्यांची कक्षा रुंद करतील. यामुळे पृथ्वी टिकून राहण्याची शक्यता कमी आहे. अशीही शक्यता आहे की जेव्हा सूर्याचा अंत होईल, तेव्हा तो बुध आणि शुक्रासह पृथ्वीलाही गिळंकृत करेल. म्हणजेच आपली पृथ्वी ज्या ताराभोवती फिरत आहे तोच तारा तिच्या नाशाचे कारण असेल.

7/7

एक अब्ज वर्षांनी पृथ्वीचा अंत होणार

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे मुख्य लेखक केमिंग झांग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, पृथ्वीचा अंत सूर्यामुळे होईल की नाही यावर अजून सगळ्यांचे एक मत झालेले नाही. पण पृथ्वी फक्त एक अब्ज वर्षासाठीच राहण्यायोग्य असेल. कारण हवामानातील बदल आणि हरितगृह परिणामामुळे पृथ्वीवरील महासागरांचे बाष्पीभवन होईल. आजपासून अब्जावधी वर्षांनंतर, जेव्हा सूर्य त्याच्या अंताच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करेल, तेव्हा जर पृथ्वी सूर्याच्या लाल महाकाय अंतापासून बाहेर पडू शकली, तर ती सूर्यापासून सुमारे दुप्पट अंतरावर जाईल. त्यामुळेच खगोलशास्त्रज्ञ नव्याने सापडलेल्या ग्रहाच्या सध्याच्या चित्राकडे पृथ्वीचे भविष्य म्हणून पाहत आहेत.