मुंबई : गेल्या पाच वर्षांत महागाईच्या दरानं उच्चांक गाठला आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर हा ७.३५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. याआधी जुलै २०१४ या महिन्यात महागाईचा दर ७.३९ टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर आता डिसेंबर महिन्यात म्हणजेच मागच्या महिन्यात हा दर ७.३५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.५४ टक्के होता. तर २०१८ च्या डिसेंबर महिन्यात हा दर २.११ टक्के इतकाच होता. मात्र सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून समोर आलेल्या आकड्यांनुसार गेल्या पाच वर्षांतला उच्चांकी दर महागाईने डिसेंबर महिन्यात गाठला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महागाईवर सरकार लगाम लावत आहे. खाण्या-पिण्याच्या गोष्टी महागल्यामुळे डिसेंबरमध्ये महागाईच्या दरात वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात ही वाढ ७.३५ टक्क्यांनी झाली आहे तर नोव्हेंबरमध्ये हा दर ५.५४  टक्क्यांनी वाढला होता. गेल्या महिन्याभरापासून मोदी सरकारला महागाईचा फटका पडत आहे. ऑक्टोबरमध्ये ४.२ टक्के महागाई होती तर नोव्हेंबर मध्ये ५.५४ टक्के. 


महागल्या भाज्या, इंधन दरवाढीचा देखील फटका 


भाज्यांच्या दरात गेल्या कित्येंक दिवसांपासून वाढ पाहायला मिळत आहे. कांदा, टोमॅटो आणि इतर भाज्यांच्या वाढत्या दरामुळे डिसेंबर महिन्यात सर्वाधिक महागाई होती. याचा फटका सामान्यांना पडला. एवढंच नाही तर पेट्रोल- डिझेल दरमात वाढ झाल्याचा फटका देखील महागाईला पडला आहे. 


महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये २ टक्के होता. तर नोव्हेंबर महिन्यात ३ टक्के. डिसेंबर महिन्यात भाज्यांची महागाई 0.५ टक्क्यांनी वाढली होती.