मध्य प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त (pm modi birthday) आफ्रिकेच्या नामिबियामधून (Namibia) भारतात आठ चित्ते (cheetah) आणण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त (pm modi birthday) मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (madhya pradesh kuno national park) या चित्त्यांना सोडण्यात आलं. या चित्त्यांच्या (cheetah) आगमनानंतर देशात राजकारण सुरु झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसने (Congress) मनमोहन सिंग सरकारच्या (manmohan singh government) काळात प्रोजेक्ट चिता (project cheetah) सुरु करण्यात आल्याची आठवण करुन दिली. तर यावर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी पूर्वी देशातून कबुतरे सोडली जात होती तर आता चित्ते सोडले जातात असा टोला लगावलाय.


दुसरीकडे मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (kuno national park) चित्त्यांच्या शिकारीसाठी हरणांना (deer) पाठवण्यात आल्याच्या वृत्तावरून वाद निर्माण झाला आहे. नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या कुलदीप बिश्नोई (kuldeep bishnoi) यांनी यावर आक्षेप घेतला आहे. हे बिश्नोई समाजाच्या (bishnoi community) भावना दुखावणारे असल्याचे म्हणत त्यांनी केंद्र सरकारकडे (central government) हा प्रकार तात्काळ थांबवावा, अशी मागणी केली आहे. (Deer chital sent for hunting cheetahs BJP leader Kuldeep Bishnoi objected)


या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत कुलदीप बिश्नोई (kuldeep bishnoi) यांनी सोमवारी ट्विट केलं आहे. "चितळ आणि हरणांना चित्त्यांचे अन्न म्हणून पाठवले जात असल्याची माहिती येत आहे, जी अत्यंत निंदनीय आहे. मी केंद्र सरकारला विनंती करतो की राजस्थानमधील हरणांच्या प्रजाती आणि बिश्नोई समाजाच्या भावना लक्षात घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि तसे असेल तर ते त्वरित थांबवावे," असं ट्विट कुलदीप बिश्नोई यांनी केलं आहे.



बिष्णोई समाजाची (bishnoi community) काळ्या हरणावर (Deer) धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील बिश्नोई समाजाच्या अनेक संघटनांनी चित्त्याकडे पाठवल्या जाणाऱ्या हरणांना विरोध केला आहे. 


राजकीय पक्षांनीही यावरुन विरोध करण्यास सुरुवात केली आहे. 17 सप्टेंबर रोजी नामिबियातून 8 चित्ते मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले आहेत. आफ्रिकेतून भुकेने व्याकूळ झालेल्या चित्त्यांची भूक भागवण्यासाठी राजगड जिल्ह्यातील नरसिंहगड चिडीखो वन अभयारण्यातून 181 चितळ पाठवल्याची बातमी समोर आली होती.