नवी दिल्ली : सिक्कीममध्ये रस्त्यावरून सुरू असलेल्या वादानंतर चीनने आता भारताला धमकी दिली आहे. भारताने अजून चीनशी झालेल्या १९६२च्या युद्धाचा धडा घेतला नसल्याचं चीनने म्हटलं आहे. यावर भारतानेही कडक शब्दात चीनला सुनावलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संरक्षण मंत्री अरूण जेटली यांनी चीनला उत्तर देताना म्हटलं आहे की, १९६२ आणि २०१७ मध्ये मोठा फरक आहे. एका चॅनेलच्या कार्यक्रमात बोलताना अरूण जेटली यांनी म्हटलं आहे की, १९६२ आणि आताच्या परिस्थितीत मोठं अंतर आहे.


चीनने भारत-चीन दरम्यान झालेल्या १९६२ च्या युद्धाचा उल्लेख करताना म्हटलं आहे, भारताला यापासून धडा घेण्याची गरज आहे. 


चीनचं हे वक्तव्य इंडियन आर्मीचे प्रमुख बिपिन रावत यांच्या वक्तव्यानंतर आलं, ज्यात म्हटलं होतं की, इंडियन आर्मी चीन, पाकिस्तान आणि अंतर्गत धोक्यांचा सामना करण्यास तयार आहे. 


चीनच्या सेना प्रमुखांनी उत्तर देतांना म्हटलं होतं की, आम्हाला अपेक्षा आहे, इंडियन आमीने इतिहासापासून धडा घ्यावा.