केरळ : संरक्षण मंत्री निर्मला सितारमण या पुराचा तडाखा बसलेल्या कोडगू जिल्ह्याची पाहणीसाठी गेल्या असता त्यांचा जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आलेले मंत्री महेश यांच्याशी वाद झाला. महेश यांनी सितारमण यांना वेळेअभावी पत्रकार परिषद आटोपती घेण्यासाठी सांगितलं तेव्हा सितारमण यांना राग अनावर झाला.


'मी केंद्रीय मंत्री आहे'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सितारमण यांनी मंत्री महेश यांच्याकडे कटाक्ष टाकून, 'मी केंद्रीय मंत्री आहे आणि तुमच्या सूचनांचं पालन करत आहे असं म्हटलं.  याचबरोबर जिल्हा प्रशासनानं जे वेळापत्रक ठरवून दिलं आहे. त्याचनुसारच ही पत्रकार परिषद घेत असल्याचं'ही त्या म्हणाल्या. 



मीडियासमोर बाचाबाची 


 याखेरीज त्या पूराचा फटका बसलेल्या नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांना मंत्री महेश यांनी अधिकराऱ्यांना पुनर्वसन कामासाठी जायचं असल्यानं आधी त्यांच्याशी संवाद साधण्यास सांगितलं.


 त्यानुसार सितारमण यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधण्यापूर्वी आणि पत्रकार परिषदेपूर्वी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे हा सारा प्रकार माडियासमोर घडला.