Defence Minister​ Rajnath Singh on Congress : टी-20 वर्ल्ड कपचा थरार चालू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी विरोधी पक्षांवर निशाणा साधताना क्रिकेटच्या नियमावलीचा आधार घेत निशाणा साधला आहे. हिमाचल प्रदेशातील बैजनाथ आणि बाल्ह विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार सभांना संबोधित करताना ते बोलत होते. (Rajnath Singh criticizes Congress and Aap latest marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारणाच्या खेळपट्टीवर भाजप (BJP) हा गुड लेंथचा बॉल असून काँग्रेस वाईड बॉल (Wide Ball) तर आम आदमी पार्टी तर नो-बॉल (No-ball) असल्याचं म्हणत राजनाथ सिंह यांनी एकाच वेळी काँग्रेस (Congress) आणि 'आप'वर निशाणा साधला आहे. काँग्रेस एक असं जहाज आहे ज्याचं इंधन संपलं आहे. कोणताही पायलट आला तरी काँग्रेसचं जहाज बुडणारच असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले.


हिमाचल प्रदेशमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा संकल्प केला आहे. आम्ही हे मतं मिळवण्यासाठी हे करत आहोत, असे काँग्रेसवाले सांगत आहेत. मात्र आम्हाला समाजात फूट पाडून मतं मिळवायची नाहीत. गोव्यात अनेक वर्षांपासून समान नागरी संहिता लागू आहे मग गोव्यातील समाजात फूट पडली का?, असा सवालही राजनाथ सिंह यांनी केला.



काँग्रेसच्या राजवटीत देशाची अर्थव्यवस्था जगात नवव्या किंवा दहाव्या क्रमांकावर होती. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आज भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा भारताची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या तीन देशांमध्ये असेल, असं राजनाथ सिंह म्हणाले.