नवी दिल्ली : चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावा दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह वास्तविक नियंत्रण रेखा (एलएसी) भागाला भेट देतील. संरक्षणमंत्री 2 दिवसांच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख दौऱ्यावर जाणार आहेत. ते एलएसी तसेच एलओसीला भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे हे देखील असणार आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे 17 जुलैला लेह येथे पोहचतील, येथून ते LOC क्षेत्रात जातील. जेथे पाकिस्तान सीमेवर असलेल्या तयारीचा आढावा घेतील. यानंतर, 18 जुलै रोजी राजनाथ सिंह LAC भागात जाऊन चीन सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतील.


संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यापूर्वी दिल्लीत अनेक वेळा लष्कर प्रमुख, संरक्षण संरक्षण प्रमुख यांच्यासोबत बैठक घेतली आणि सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. 15 जून रोजी भारताचे 20 सैनिक शहीद झाल्यानंतर सीमेवर तणाव वाढला होता.


मेपासून भारत आणि चीनमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अलीकडेच दोन देशांच्या सैन्यामधील कराराच्या आधारे सीमेवरुन सैन्य मागे हटण्याची प्रक्रिया सुरु आहे. चीनी सैन्याने गलवान, पेंगाँग परिसरातून माघार घेतली आहे आणि सुमारे दोन किमी अंतर सैन्य मागे गेले आहे.


विशेष म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात राजनाथ सिंह लेहला जाणार होते, पण त्यांचा दौरा रद्द झाला. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: लेह येथे पोहोचले.


लडाखमध्ये 32 रस्ते, चीनच्या सीमेपर्यंत नॉनस्टॉप रस्ता बांधकाम


पीएम मोदी यांनी नीमू पोस्ट येथे सैन्य दलाच्या जवानांची भेट घेऊन चीनला कडक संदेश दिला. पंतप्रधानांनी असे म्हटले होते की, 'विस्तारवादाचे युग संपले आहे आणि आता विकासवादाचे युग सुरू आहे.'