नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)मध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास आग लागलीय. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग पसरलीय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. पीसी ब्लॉकमध्ये इमर्जन्सी वर्डजवळ ही आग लागलीय. आग लागल्यानंतर तत्काळ इमर्जन्सी लॅब बंद करण्यात आला. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तब्बल ३४ गाड्या दाखल झाल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमर्जन्सी वॉर्डमधून रुग्णांना शिफ्ट करण्यात आलं. त्यानंतर वॉर्ड बंद करण्यात आला. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. 



अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ४.५० च्या सुमारास आग लागल्याचं लक्षात आल्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला फोनवरून याबद्दल माहिती दिली. 


अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचं म्हटलंय. 


रुग्णांना याचा फटका बसू नये यासाठी रुग्णालयातून इतरत्र हलवण्यात येतंय. एम्समधील इमर्जन्सी लॅब, सुपरस्पेशालिटी ओपीडी वॉर्ड तसंच एबीआय बंद करण्यात आलंय. काही रुग्णांना एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डमधून सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलंय.