नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने भाजपला जोरदार दणका दिला असताना आता डीसीपी (DCP) राजेश देव यांनाही चांगलाच दणका दिला आहे. मीडियापासून दूर राहण्याचे सक्त आदेश देताना डीसीपी क्राइम राजेश देव यांना इशारा दिला आहे. त्यांना हटविण्यात यावे, असे स्पष्ट केले आहे. आम आदमी पार्टीचे  (AAP) कार्यकर्ते म्हणून डीसीपी राजेश देव यांनी कपिल गुर्जर यांचे वर्णन केले होते. डीसीपी राजेश देव यांना निवडणूक विषयी कोणतेही काम देऊ नये, असे आपल्या आदेशात निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांना निर्देश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगाने राजेश देव यांचे विधान अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. डीसीपी राजेश देव यांनी 'आप' नेते संजय सिंह यांच्यासह कपिल गुर्जरचे फोटो मंगळवारी मीडियासमोर दाखविले होते. कपिल गुर्जर यांच्याशी पक्षाचा कोणताही संबंध नाही, कपिल हा पक्षाचा सदस्य नाही, अशी घाई घाईत आम आदमी पक्षानेही स्पष्टीकरण जारी केले. त्यानंतर आपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने जोरदार दणका दिला आहे.


दरम्यान, दिल्लीत आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप आपनं केलाय. डीसीपीनं उल्लंघन केल्याचं आप म्हणतेय. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही आपनं म्हटले होते. भाजपच्या आरोपांना आपने सडेतोड उत्तर दिले.  कपिल गुर्जरशी संबंधित खुलासे म्हणजे भाजपचा कट आहे, असे आपने म्हटले. कपिल गुर्जर आपशी संबंधित नाही असंही आपनं म्हटले होते. एवढंच नाही तर गुन्हे शाखेच्या डीसीपींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 


दिल्लीच्या शाहिन बाग गोळीबार प्रकरणातील आरोपी कपिल गुर्जर हा आम आदमी पार्टीशी संबंधीत असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला होता. गुर्जरच्या मोबाईलमधून काही फोटो पोलिसांच्या हाती लागलेत त्यात तो आप नेता संजय सिंह आणि आतिशी सोबत दिसतोय. हे फोटो मागच्या वर्षीचे आहेत जेव्हा गुर्जरने त्याच्या वडिलांसोबत आपचं सदस्यत्व घेतलं होते. 


दिल्लीत भाजपचं सरकार आल्यास शाहिनबागमधील आंदोलन एका दिवसात संपवून टाकू असं विधान भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी केलंय. या आंदोलकांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या नेत्यांचं समर्थन मिळत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 


शाहीन बाग इथे सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान गोळीबार करणारा कपिल गुर्जर हा आम आदमी पार्टीचा सदस्य असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला होता. आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह, आप नेते कालकाजी आणि उमेदवार आतिशी यांच्यासह आपच्या अनेक नेत्यांसोबत त्याचे फोटो असून २०१९ मध्येच तो आपचा सदस्य झाला होता, अशी माहिती पोलीस पुढे आणली होती.


दरम्यान, आपने आपला जाहिरनामा प्रकाशित केलाय. यात जुन्या आश्वासनांसह  काही नव्या आश्वासनांचीही भर घालण्यात आलीये. २४ तास वीज, २०० युनिट पर्यंत मोफत वीज, २० हजार लीटर मोफत पाणी, झोपडपट्टीवासीयांना पक्की घरं,  चांगली शिक्षा, उत्तम तपासणी आणि महिला सुरक्षेचंही आश्वासन आपनं आपल्या जाहिरनाम्यात दिले आहे.