Fake Instagram Account देशाची राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्ली शहरामध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने खुन्नस काढण्याच्या हेतूने इन्स्टाग्रामवर आपल्या मित्राच्या बहिणीला आणि नातेवाईकांना अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले. या विद्यार्थिनीने खोट्या अकाऊंटवरुन हा सारा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. नॉर्थ दिल्लीमधील सायबर पोलीसांनी कारवाई करताना आरोपी विद्यार्थीनीला अटक केली आहे.


त्यांची मैत्री तुटली...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी विद्यार्थिनीविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या मुलीच्या भावावरील खुन्नस काढण्यासाठी हा सारा प्रकार मुद्दा केल्याची कबुली आरोपी तरुणीने दिली आहे. खोट्या इन्स्टाग्राम प्रोफाइल बनवण्यासाठी आणि अश्लील संदेश पाठवण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाइल फोन आणि सिमकार्डसहीत वादग्रस्त पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलगी आणि एका मुलाची मैत्री होती. मात्र काही कारणांमुळे या दोघांची मैत्री तुटली.


बहिणीने धमकावलेलं


या दोघांची मैत्री तुटल्यानंतर या मुलाच्या बहिणीने आरोपी मुलीला आता माझ्या भावाला यापुढे भेटू नको असं सांगितलं. मित्राच्या बहिणीने धमकावल्याने संतापून आरोपी मुलीने एक बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं. त्यानंतर या मुलीने तिचा मित्र आणि त्याच्या बहिणीचा फोटो एकत्र करुन इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. तसेच तिने मोबाईल नंबरही शेअर केला. यावर अश्लील मेसेज पाठवण्यास या तरुणीने सांगितलं.



पोलिसांनी केली अटक


यासंदर्भातील तक्रार दिल्ली नॉर्थच्या सायबर पोलिसांकडे करण्यात आली. या प्रकरणामध्ये तपास करणारे स्टेशन एसएचओ पवन यांच्या टीमने तपास सुरु केला तेव्हा इन्स्टाग्राम प्रोफाइल नकली असल्याची माहिती समोर आली. तसेच हे खातं कोणी तयार केलं आहे याबद्दलची माहिती मिळाली. या साऱ्या प्रकारामागे याच मुलाची मैत्रीण असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तिला अटक करण्यात आळी. ही तरुणी बॅचलर ऑफ आर्ट्सच्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत आहे.