Delhi Building Collapse: दिल्लीध्ये (Delhi) एक इमारत कोसळली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत फक्त 9 सेकंदात संपूर्ण इमारत जमीनदोस्त होताना दिसत आहे. भरदिवसा ही इमारत कोसळली असून अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे नष्ट होताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भजनपुरा (Bhajanpura) परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान, इमारत कोसळतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील भजनपुरा येथे बुधवारी एक इमारत अचानक कोसळली. विजय पार्कमध्ये ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. दरम्यान या दुर्घटनेत कोणातीही जीवितहानी झालेली नाही. एएनआयने इमारत कोसळतानाचा व्हिडीओ शेअर केला असून व्हायरल झाला आहे. 


इमारत कोसळल्याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी अग्निशमन दलाला इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. यानंतर तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. दरम्यान व्हिडीओत दिसत आहे त्याप्रमाणे इमारत कोसळणार आहे याची कोणतीही कल्पना तेथील लोकांना नव्हती. यामुळेच इमारत कोसळल्यानंतर लोकांची आरडाओरड सुरु असल्याचा आवाज ऐकू येत आहे.



या इमारतीत जीवितहानी झालेली नसली तरी शेजारची घरं आणि दुकानांचं नुकसान झालं आहे. नेमकं किती नुकसान झालं आहे याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दुर्घटनेनंतर तेथील रस्त बंद करण्यात आले असून मलबा हटवला जात आहे. 


सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी किंवा मृत्यू झालेला नाही. याआधी 1 मार्चला दिल्लीच्या रोशनारा रोड येथे आग लागल्यानंतर चार मजली इमारत कोसळली होती. यामध्येही कोणती जीवितहानी झाली नव्हती.