नवी दिल्ली : दिल्लीतल्या बुराडीमध्ये एकाच कुटुंबातल्या ११ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. क्राईम ब्रांचनं पुन्हा एकदा घर आणि दुकानाचा तपास केला. यावेळी पोलिसांना काही वह्या मिळाल्या आहेत. झी न्यूजच्या हाती या वह्यांची काही पानं लागली आहेत. या पानांवर काही महिन्यांची नावं आणि वेळ, मोक्ष आणि देवाला प्रसन्न करण्याबद्दलच्या गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत. वहीच्या पहिल्या पानावर ललितनं तीन कॉलम केले आहेत. वरच्या तीन महिन्यांमध्ये २०१४ सालच्या तीन महिन्यांचा उल्लेख आहे. यानंतर आणखी २ कॉलम बनवण्यात आले आहेत. यामध्ये रवी आणि बुध लिहून काही तारखा आणि वेळाचा उल्लेख करण्यात आलाय. काही तारखांची नोंद असणं ललितसाठी गरजेचं असल्याचं या वहीकडे पाहून कळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वहीमध्ये लिहिलेल्या काही गोष्टींना वाचणं कठीण जात आहे. पण नीट लक्ष देऊन वाचल्यास यामध्ये ललितच्या कुटुंबाबात लिहिण्यात आलंय. या वहीकडे पाहिलं तर ललितची मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती हे लक्षात येईल. ललित हा कुटुंबातला सगळ्यात लहान मुलगा होता. आपल्या स्वप्नात वडिल येतात असा दावा ललित करायचा आणि वडिलांनी स्वप्नात सांगितलेल्या गोष्टी ललित वहीवर लिहायचा. 



ललित कोणतीही गोष्ट तारीख आणि वेळेच्या हिशोबानं लिहायचा हे या वहीकडे पाहून दिसतंय. या वहीमध्ये एकाच व्यक्तीनं लिहिलं आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत.



ललितच्या वहीचं तिसरं पान


दिवसातून तीनवेळा व्हायची पूजा


ललितच्या बहिणीला मंगळ होतं, त्यामुळे ललित तिच्या लग्नाबद्दल चिंतेत होता. मंगळाचा प्रभाव कमी करण्यासाठी ललित दिवसातून तीन वेळा विशेष पूजा करायचा. या पुजेला घरातल्या सगळ्यांना उपस्थित असणं आवश्यक असायचं


लटकलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह


दिल्लीच्या बुराडीमध्ये एकाच कुटुंबातल्या ११ जणांचे मृतदेह घरात सापडले. यातल्या वृद्ध महिलेचा मृतदेह जमिनीवर सापडला तर उरलेले मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले. या मृतदेहांच्या डोळ्याला आणि तोंडाला पट्टी बांधण्यात आली होती. तर कानामध्ये कापूस घालण्यात आला होता.